कोणते गिफ्ट्स टॅक्सेबल असतात?
जर तुम्हाला एखाद्या मित्राने, नातलगाने किंवा ओळखीच्या व्यक्तीने एकाच आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांहून अधिक किंमतीचा गिफ्ट (जसे की रोख रक्कम, दागदागिने, शेअर्स, एंटिक वस्तू) दिला असेल, तर तो 'टॅक्सेबल इनकम' म्हणून मोजला जातो. ही रक्कम ‘इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस’ या वर्गात धरली जाते आणि त्यावर कर भरावा लागतो.
advertisement
ब्लड रिलेशनमधील गिफ्ट्स करमुक्त
पती, पत्नी, आई-वडील, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी, आजोबा-आजी, मामा, मावशी, काका, काकू, बहीण-नणंद अशा जवळच्या नात्यांमधून मिळणारे गिफ्ट्स मात्र कराच्या बाहेर असतात. या नात्यातून कितीही मोठं गिफ्ट मिळालं तरी त्यावर इनकम टॅक्स लागणार नाही.
लग्नातले गिफ्ट्सही टॅक्स फ्री
एखाद्याच्या लग्नाच्या निमित्ताने मिळणारे गिफ्ट्सही इनकम टॅक्सच्या कक्षेबाहेर असतात. मात्र, हे गिफ्ट्स नवरदेव किंवा नवरीला मिळाले आहेत हे स्पष्ट असणं आवश्यक आहे. इतर कौटुंबिक समारंभ किंवा वाढदिवस यासाठी मात्र ही सवलत लागू होत नाही.
कंपनीकडून मिळणारे गिफ्ट्स
जर एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीकडून सणासुदीला किंवा इतर विशेष प्रसंगी गिफ्ट्स मिळतात, तर त्यावरही टॅक्स लागू होतो. मात्र, अशा गिफ्ट्सची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर ते टॅक्स फ्री मानले जातात.
वडिलोपार्जित मालमत्तेवर कर लागू होतो का?
जर एखाद्याला वडिलोपार्जित मालमत्तेचा भाग मिळाला, तर त्यावर मिळालेल्या क्षणी कर लागू होत नाही. मात्र, जर ही मालमत्ता विकली गेली, तर त्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नावर 'Capital Gains Tax' लागू होतो.
गिफ्ट घेताना काय लक्षात ठेवावं?
तुम्हाला कोणाकडून गिफ्ट मिळालं आहे, त्याची किंमत काय आहे आणि तो गिफ्ट कोणत्या प्रसंगासाठी दिला आहे. हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवावं. कोणत्याही शंकेसाठी योग्य वेळी CA किंवा टॅक्स सल्लागाराचा सल्ला घ्यावा. चुकीच्या माहितीमुळे अनेकदा आयकर विभागाच्या रडारवर येण्याची शक्यता असते.