तब्बल ९ टक्क्यांनी उसळला
Adani Ports ७ टक्क्यांहून अधिक तेजीसह व्यवहार करत आहे. याव्यतिरिक्त Bajaj Finance, Jio Financial आणि Shriram Finance यांसारख्या कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली आहे. आयटी क्षेत्रातील Infosys आणि फार्मातील Dr. Reddy’s या शेअर्सनीही या नफ्याच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे.
रिअल्टी आणि बँकिंगमध्ये उत्साह
advertisement
बाजारातील सर्वच सेक्टर आज हिरव्या निशाण्यावर आहेत. यात Nifty Realty ने सर्वाधिक ४ टक्क्यांची झेप घेतली आहे. ऑटो, इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांचे भावही कडाडले आहेत. बँक निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक वाढल्याने बँकिंग क्षेत्रातील मरगळ झटकली गेली आहे.
रुपयाची ताकद वाढली!
ट्रेड डीलचा सकारात्मक परिणाम केवळ शेअर बाजारावरच नाही, तर भारतीय रुपयावरही झाला आहे. मंगळवारी रुपया १.२ टक्क्यांनी वधारून प्रति डॉलर ९०.४० च्या पातळीवर उघडला. गेल्या सत्रात तो ९१.५१ वर बंद झाला होता. परदेशी गुंतवणूकदारांचा (FII) वाढता विश्वास रुपयाला बळ देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
India VIX आणि मार्केट ब्रेड्थ
बाजारात तेजी असली तरी India VIX (व्होलॅटिलिटी इंडेक्स) ७ टक्क्यांनी वाढला आहे. याचा अर्थ बाजार वेगाने वर जात असताना त्यात अस्थिरताही वाढली आहे. मात्र, निफ्टी ५० पैकी ४८ शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत, तर केवळ २ शेअर्स घसरले आहेत. यावरून ही तेजी किती व्यापक आहे, हे लक्षात येते.
