पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांना खास ट्विट
पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला. 'मेड इन इंडिया' उत्पादनांवरील टॅरिफ कमी करून तो १८% करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. १४० कोटी भारतीयांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार. ट्रम्प यांचे नेतृत्व जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, भारत त्यांच्या शांतता प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देत आहे."
advertisement
भारतीय बाजारासाठी हे 'गिफ्ट' का महत्त्वाचे?
बजेट सादर झाल्यानंतर बाजार एका मोठ्या बूस्टरच्या शोधात होता. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आता ४ मुख्य क्षेत्रांची चांदी होणार आहे. १. आयटी (IT): अमेरिकन कंपन्यांकडून मिळणाऱ्या ऑर्डर्स आता वाढतील. २. फार्मा (औषध निर्मिती): भारतीय औषधांची अमेरिकेतील निर्यात स्वस्त होईल. ३. ऑटोमोबाईल: सुटे भाग आणि वाहनांच्या निर्यातीला मोठी गती मिळेल. ४. टेक्सटाईल (कापड उद्योग): भारतीय कापड उद्योगासाठी अमेरिकेची दारं आता अधिक रुंदावली आहेत.
बाजारात 'धमाका' होणार?
तज्ज्ञांच्या मते, या डीलमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा (FII) भारतीय बाजारावरील विश्वास वाढला आहे. "रातोरात झालेली ही घडामोड आज शेअर बाजारात मोठी तेजी घेऊन येऊ शकते. निफ्टी २५,५०० चा टप्पा गाठण्यासाठी आता सज्ज झाला आहे," असे संकेत मिळत आहेत.
