TRENDING:

रातोरात अमेरिकेत मोठ्या घडामोडी, ट्रम्प यांच्या एका निर्णयानं Share Market मध्ये धमाका होणार, 4 सेक्टर्सची लॉटरी?

Last Updated:

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतावरचा टॅरिफ ५० वरून १८ टक्के झाला, IT, फार्मा, ऑटो, टेक्सटाईल सेक्टर्सना मोठा फायदा आणि शेअर मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता.

advertisement
भारताचं बजेट सादर झालं, त्यानंतर जागतिक पातळीवर वेगळीच रणनिती आखली जात होती, ट्रम्प यांनी अचानक एक मोठा निर्णय घेतला त्यामुळे भारतासोबत रखडलेल्या चर्चांचा मार्ग मोकळा होणार आणि संपूर्ण मार्केट भारतासाठी खुलं होणार असल्याचं या निर्णयामुळे शक्य झालं आहे.
News18
News18
advertisement

ट्रेड डीलदरम्यान काय झालं?

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलकडे सर्वांचे डोळे लागले होते, अखेर सोमवारी रात्री खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच आनंदाची बातमी दिली. रशियाकडून तेल घेतल्यामुळे ट्रम्प यांनी आपल्यावर जे कडक निर्बंध लादले होते, ते आता मागे घेतले आहेत.

सोप्या भाषेत सांगायचं तर, अमेरिकेने भारतावरचा कर तब्बल ३२ टक्क्यांनी कमी केला आहे. ही केवळ एक सरकारी घोषणा नाही, तर आशियातील शेअर मार्केटसाठी हा एक जॅकपॉट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांनी भारतासाठी लावण्यात आलेल्या 50 टक्क्यांचा टॅरिफ मागे घेतला असून आता 18 टक्के टेरिफ लावण्यात येईल अशी घोषणा केली. यामुळे आता शेअर मार्केटवरही परिणाम होणार आहे.

advertisement

बजेटनंतर गुंतवणूकदार थोडे धास्तावलेले होते, पण ट्रम्प यांच्या या निर्णयाने बाजारात नवी हवा भरली आहे. तज्ज्ञांच्या मते, निफ्टी आता २५,५०० चा टप्पा सहज पार करेल. जेव्हा टॅरिफ कमी होतं, तेव्हा आपल्या देशातील कंपन्यांना अमेरिकेत माल विकणं स्वस्त पडतं.

याचा थेट फायदा कंपन्यांच्या नफ्यावर होतो आणि पर्यायाने त्यांच्या शेअर्सचे भाव वाढतात. चार सेक्टर्सना सर्वात मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हे शेअर्स आहेत आणि मागच्या काही दिवसांपासून त्याचं मूल्य घसरलं असेल तर आज रिकव्हर होऊन ते ग्रीनमध्ये येण्याची शक्यता आहे.

advertisement

कोणत्या सेक्टर्सला होणार फायदा

आयटी क्षेत्र (IT): अमेरिकेतून यांना मोठा व्यवसाय मिळतो, त्यामुळे इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स पळू शकतात.

फार्मा (औषध कंपन्या): सिप्ला आणि ग्लेनमार्क ला अमेरिकेच्या बाजारात आता जास्त वाव मिळेल.

ऑटो आणि डिफेन्स: टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि संरक्षण क्षेत्रातील HAL सारख्या शेअर्समध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे.

advertisement

टेक्सटाईल (कापड उद्योग): अमेरिकेला होणारी कापड निर्यात वाढणार असल्याने ट्रिडेंट आणि वेल्सपन कडे लक्ष ठेवा.

आतापर्यंत अमेरिकन गुंतवणूकदार भारतापासून थोडे लांब होते, पण या करारानंतर 'फॉरेन इन्व्हेस्टर्स' (FII) पुन्हा एकदा भारतीय बाजारात पैसा ओतायला सुरुवात करतील. जर तुम्ही 'लाँग टर्म'साठी गुंतवणूक करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते.

advertisement

डिस्क्लेमर: या बातमीमध्ये दिलेली माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. हे कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक सल्ले नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी किंवा नुकसानीसाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
रातोरात अमेरिकेत मोठ्या घडामोडी, ट्रम्प यांच्या एका निर्णयानं Share Market मध्ये धमाका होणार, 4 सेक्टर्सची लॉटरी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल