पण अनेकदा अशा गोष्टी चोरी झाल्याच्या घटना समोर येतात. काही जण मजेत, तर काही खरोखरच स्वार्थापोटी रेल्वेतून चादरी, ब्लँकेट किंवा टॉवेल घेऊन जातात. पण कधी विचार केलाय का की या चोरीला जाणाऱ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण असतं?
नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असाच दावा करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये सांगितले गेले की, जर ट्रेनमधून ब्लँकेट किंवा चादर चोरी झाली तर त्याची किंमत कोच अटेंडंटला भरावी लागते आणि त्याच्याकडून प्रत्येकी 85 रुपये वसूल केले जातात. हा व्हिडिओ हास्यास्पद वाटत असला तरी अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला आणि चर्चा रंगली.
advertisement
या संदर्भात जेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांशी चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की रेल्वे आता या सुविधांचे व्यवस्थापन स्वतः करत नाही. म्हणजेच ब्लँकेट-बेडशीट पुरवण्याचं काम आता ठेकेदारांकडे सोपवण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या ट्रेनसाठी 100 बेडशीट लागणार असतील तर ठेकेदार त्या ट्रेनला पुरवतो. रेल्वेला यातून काही फरक पडत नाही की तो बेडशीट कुठून आणतो किंवा कसं अरेंज करतो.
म्हणून जर ब्लँकेट चोरी झाले, तर त्याची जबाबदारी कोच अटेंडंटची थेट राहत नाही, कारण ते अटेंडंट्स हे ठेकेदाराने ठेवलेले कर्मचारी असतात. त्यामुळे वास्तविक नुकसान भरपाई ठेकेदाराकडे जाते. मात्र, काही वेळा ठेकेदार आपल्या कर्मचाऱ्यांकडूनच पैसे वसूल करतो. अशा वेळी अटेंडंटच्या खिशातून 150 ते 200 रुपये प्रतिचादर किंवा ब्लँकेट वसूल केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणजेच सोशल मीडियावर सांगितलेले "85 रुपये" हे खरे आकडे नसून कुठल्यातरी जुन्या चर्चेतून किंवा अफवेतून आले असावे.
पण ही गोष्ट प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा धडा आहे. रेल्वेत प्रवास करताना मिळालेल्या सुविधा जबाबदारीने वापरल्या पाहिजेत. मजेसाठी किंवा चेष्टेत घेतलेला ब्लँकेट, टॉवेल किंवा चादर कुणाच्या तरी पगारातून वजा होऊ शकतो. अनेक वेळा हे कर्मचारी आधीच अल्प पगारावर काम करत असतात. त्यात जर अशा गोष्टींसाठी त्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं, तर त्यांच्या आयुष्यावर त्याचा थेट परिणाम होतो.