रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या नियमाबाबत लोकसभेत माहिती दिली. ट्रेनमधील प्रवाशांना आता कितीही सामना घेऊन जाता येत, त्यामध्ये केवळ स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थ नेण्यावर बंदी आहे. इलेक्ट्रॉनिक मोठ्या वस्तू फुकटात घेऊन जाता येत नाहीत. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास केल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. हा नियम लागू करण्यात आला होता मात्र कठोरपणे त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती जी नव्या वर्षात केली जाणार आहे.
advertisement
तुम्ही ट्रेननं प्रवास करत असाल तर हा नियम तुम्ही लक्षात ठेवा. रेल्वे नियमांनुसार सेकंड क्लास प्रवाशांना 35 किलोपर्यंत सामान मोफत नेण्याची परवानगी आहे. स्लीपर क्लास तसेच एसी थ्री टियर आणि चेअर कारसाठी ही मर्यादा 40 किलो निश्चित करण्यात आली आहे. एसी टू टियर आणि फर्स्ट क्लास प्रवाशांना 50 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते. तर एसी फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी सर्वाधिक म्हणजे 70 किलोपर्यंत सामान मोफत नेण्याची सवलत आहे. या मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यास अतिरिक्त शुल्क भरणे बंधनकारक असेल.
रेल्वेने मोठ्या आकाराच्या ट्रंक, बॉक्स किंवा जड सूटकेसवरही निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत. ठराविक आकारापेक्षा मोठे किंवा अतिजड सामान पॅसेंजर कोचमध्ये नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. अशा सामानासाठी प्रवाशांना ब्रेक वॅन किंवा पार्सल वॅनमध्ये बुकिंग करावे लागेल. यामुळे डब्यातील गर्दी आणि अव्यवस्था कमी होईल, असा रेल्वेचा दावा आहे. नियम स्पष्ट असले तरी, प्रत्यक्षात स्टेशनवर सामानाचे वजन कसे तपासले जाणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
