बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 2.7 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3.5 टक्क्यांची घसरण झाली. सगळे सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात बंद झाले. मीडिया इंडेक्समध्ये 4.7 टक्के घट झाली. आयटी इंडेक्स 3.4 टक्के घसरला, तेल आणइ गॅस, मेटल, कन्झ्युमर ड्युरेबल्स, फार्मा आणि एनर्जी प्रत्येक इंडेक्समध्ये 2 टक्क्यांची घट झाली.
जिओजित फाइनॅन्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही. के. विजयकुमार म्हणाले, "अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प कोलंबियावर 25 टक्के टेरिफ लावण्यासारखी नवी धमकी देत आहेत. कोलंबियाने बेकायदेशीर अप्रवाश्यांना परत प्रवेश द्यायला नकार दिला आहे, त्यामुळे ट्रम्प अशी धमकी देत आहेत. कॅनडा आणि मॅक्सिकोवर 25 टक्के टेरिफ लावण्याची धमकी 1 फेब्रुवारीपासून लागू होऊ शकते. त्यामुळेच, खरंच ट्रम्प चीन आणि इतर देशांर टेरिफ लावण्यासहित इतर धमक्या खऱ्या करून दाखवतील का? हा प्रश्न जगभरातील बाजार आणि आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींना पडला आहे. "
advertisement
ते पुढे म्हणाले, " या आठवड्यात खूप चढ-उतार बघायला मिळण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात यूएस फेडचा निर्णय आणि भारताच्या केंद्रीय बजेटमधील घोषणाही महत्त्वाच्या असतील."
बाजारतज्ज्ञांनी म्हटलंय की मजबूत रिकव्हरी होत नसल्याने पुढच्या आठवड्यातही घसरण सुरू राहू शकते. त्यामुळे सावध रहायला हवं. जिओजित फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे आनंद जेम्स म्हणाले, "शुक्रवारी एनएसई 500 इंडेक्समधले सुमारे 50 टक्के शेअर्समध्ये त्यांच्या त्या दिवसातील सर्वोच्च स्तरापासून कमीतकमी 2 टक्क्यांची पडझड झाली. यावरूनच दिसतंय की कोणीही जोखीम घ्यायला तयार नाही त्यामुळे पुढे तीव्र घसरण येऊ शकते. "
ते पुढे म्हणाले,"निफ्टीसाठी मजबुतीचे संकेत हवे असतील तर त्याने 23,211 च्या वर उसळी मारायला हवी. तसं झालं नाही तर येत्या काही व्यवहार सत्रांत निफ्टी 22,260 ते 22,000 या स्तरापर्यंत कोसळू शकतो."
मार्केट एक्सपर्ट्सचं मत आहे की अमेरिकी ट्रेड पॉलिसी आणि ग्लोबल मार्केटमधली कमकुवत स्थिती याबाबत अनिश्चितता असल्याने भारतीय शेअर बाजारात तणाव कायम राहू शकतो. बाजाराच्या पुढच्या दिशेचे संकेत लक्षात घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी फेडरल रिझर्हसंबंधी निर्णय आणि भारतातील बजेटमध्ये होणाऱ्या घोषणांवर बारीक नजर ठेवतील.
Disclaimer: (इथं दिलेली माहिती तज्ज्ञ आणि एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे जोखिमेचं आहे. विशेषतः F&O सेगमेंटमध्ये ट्रेडिंग खूप जोखिमयुक्त असते. यामुळे इन्व्हेस्टमेंटपूर्वी एखाद्या सर्टिफाइड आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)