TRENDING:

Mukesh Ambani: 'जामनगर येत्या दशकात विकासाचा निश्चित टप्पा गाठेल'- मुकेश अंबानी

Last Updated:

जामनगर येथे रिफायनरीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्ताने रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.

advertisement
(रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी)
(रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी)
advertisement

जामनगर : आशियातील सर्वात मोठी रिफायनरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने जामनगर रिलायन्स टाउनशिप इथं 25 वा वर्धापन दिन साजरा केला. यानिमित्ताने जामनगर रिफायनरी येथील समारंभात संपूर्ण अंबानी कुटुंबीय उपस्थित होतं. जामनगर रिफायनरी, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगत रिफायनिंग सुविधांपैकी एक आहे.  या कार्यक्रमाला अंबानी कुटुंबीयांनी रिफायनरीच्या प्रवासात सोबत असलेले कर्मचारी, त्यांचे कुटुंब आणि प्रमुख अधिकारी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केलं.

advertisement

सर्वात मोठी रिफायनरी रिलायन्सची

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. "जामनगर ही आमची जन्मभूमी आहे, त्यामुळेच आम्ही कन्नवरीचा जसा विकास केला तसा येथेही केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी जामनगर इथं आहे, असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.. तसंच, जगातील सर्वात मोठा गिगा कारखाना येथे आहे'

advertisement

सर्वात मोठे AI केंद्र

तसंच, 'जामनगरच्या विकासासाठी Eआम्ही सतत काम करत आहोत. जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जा उत्पादन केंद्रही इथं उभारण्यात आलं आहे. भविष्यातील पिढ्यांना डोळ्यासमोर ठेवून इथं जगातील सर्वात मोठं एआय सेंटर उभारले जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

रिलायन्स फाऊंडेशनच्या वंताराबद्दलही मुकेश अंबानी यांनी भरभरून सांगितलं. 'जखमी जनावरांना जगातील सर्व प्रकारच्या प्रगत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जात आहे. वन प्राण्यांची इथं चांगली देखरेख केली जाते. रिलायन्स फाऊंडेशनच्या सेवा कार्यक्रमांबद्दल बोलण्याची गरज नाही' असंही ते म्हणाले.

advertisement

"तुमच्या (रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांनी) त्याच्या वाढीसाठी एकत्र काम केल्यामुळे आम्ही या पातळीपर्यंत पोहोचलो आहोत. आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आपण इथं पर्यंत पोहोचलो आहोत. आपण आपल्या कामातून रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचं स्वप्न पूर्ण करू शकलो' असंही मुकेश अंबानी म्हणाले.

रिलायन्सची जामनगर रिफायनरी गेल्या आठवड्यात २५ वर्षांची झाली. 28 डिसेंबर 1999 रोजी रिलायन्सने जामनगर येथे पहिली रिफायनरी सुरू केली. आज जामनगर हे जगातील एक प्रसिद्ध रिफायनरी बनले आहे. येथील रिफायनरी हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे ज्याचा भारताला अभिमान आहे. सुरुवातीला अनेक तज्ज्ञांनी सांगितले होते की, भारतीय कंपनीला तीन वर्षांत जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारणे अशक्य आहे. पण पायाभूत सुविधांचा अभाव आणि त्या दिवशी जामनगरला आलेले वादळ असूनही, रिलायन्सने केवळ 33 महिन्यांत ते साध्य केले.

advertisement

आघाडीच्या जागतिक दर्जाच्या प्रकल्प सल्लागारांनी धीरूभाई अंबानींना वाळवंटासारख्या क्षेत्रात जिथे रस्ते, वीज किंवा पुरेसे पिण्याचे पाणीही नाही अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यांनी चेतावणी दिली की, अशा वाळवंटात मनुष्यबळ, साहित्य, तंत्रज्ञ आणि इतर सर्व इनपुट एकत्रित करण्यासाठी विलक्षण प्रयत्न करावे लागतील.

धीरूभाई अंबानी यांनी सर्व अडचणींवर मात केली आणि स्वप्न पूर्ण केले. त्यांना केवळ औद्योगिक प्रकल्पच नाही तर नंदनवनही तयार करायचे होते. 1996 ते 1999 दरम्यान, त्यांनी आणि त्यांच्या अत्यंत प्रेरित टीमने जामनगरमध्ये अभियांत्रिकीचा चमत्कार घडवला. आज, जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये फ्लुइडाइज्ड कॅटॅलिटिक क्रॅकर (FCC), कोकर, अल्किलेशन, पॅराक्सिलीन, पॉलीप्रॉपिलीन, रिफायनरी ऑफ-गॅस क्रॅकर (ROGC) आणि पेटकोक गॅसिफिकेशन प्लांट्सची जगातील सर्वात मोठी युनिट्स आहेत.

मराठी बातम्या/मनी/
Mukesh Ambani: 'जामनगर येत्या दशकात विकासाचा निश्चित टप्पा गाठेल'- मुकेश अंबानी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल