याशिवाय ओव्हरड्राफ्टची सोय मिळते, शिवाय विमा संरक्षणासह रुपे डेबिट कार्डही दिले जाते. आर्थिक ओढाताण असलेल्या कुटुंबांसाठी ही छोटी वाटणारी सुविधा प्रत्यक्षात मोठा दिलासा ठरते. हे खातं उघडण्यासाठी कोणतेही किमान शिल्लक रक्कम असणं आवश्यक नाही. गावापासून ते शहरातील कोणत्याही बँक शाखा, एटीएम किंवा बीसी पॉइंटवरून व्यवहार करण्याची मुभा असल्याने सर्वसामान्यांना बँकिंग सहज हाताळता येते. मात्र, या खात्यात महिन्याला जास्तीत जास्त चार वेळा पैसे काढण्याची मर्यादा आहे.
advertisement
सुरुवातीला तुमच्याकडे ओळखपत्राचा ठोस पुरावा नसेल तरी खातं उघडता येतं, मात्र त्यानंतर जर खातेदाराने ओळखपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा दाखवला, तर हे खाते आणखी बारा महिने वाढवले जाऊ शकते. जर तुम्ही ओळखपत्र सादर करू शकला नाहीत तर खातं बंद केलं जातं. योजनेअंतर्गत मिळणारे रुपे डेबिट कार्डही तितकेच महत्त्वाचे आहे. या कार्डासोबत दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा कवच मिळतो. 28 ऑगस्ट 2018 आधी उघडलेल्या खात्यांना हा कवच एक लाख रुपये इतका आहे. त्यासोबतच गरजेच्या वेळी दहा हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. कधी कधी महिनाअखेरची गरज भागवण्यासाठी हीच छोटी मदत कुटुंबाला सावरते.
देशभरातील जनधन खात्यांमध्ये सध्या किती रक्कम जमा आहे, याची माहिती वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकूण जमा रक्कम जवळपास दोन लाख पंचाहत्तर हजार कोटी रुपये इतकी आहे. प्रत्येक खात्यामागे सरासरी 4,815 रुपये शिल्लक ठरते. त्यांनी हेही सांगितले की 2014 मध्ये या योजनेची सुरुवात झाली, तेव्हा ती केवळ योजना नव्हती तर लाखो लोकांना औपचारिक बँकिंग प्रणालीकडे नेणारा ऐतिहासिक टप्पा होता. आज ग्रामीण आणि अर्धनगरी भागातील 78.2 टक्के खाती आणि महिलांच्या नावावर आहेत.
