ज्योती यांनी सुरुवातीला घरातूनच काम सुरू केलं. नातेवाईक, शेजाऱ्यांना त्या वाती देत असत. नंतर बचत गट सुरू करून त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळातून थोडं कर्ज घेतलं. त्यातल्या फक्त दहा हजार रुपयांत त्यांनी काम वाढवलं. पहिल्यांदा सायकलवर बसून बाजारात जाऊन वाती विकायच्या. हळूहळू मागणी वाढू लागली. आता त्या तब्बल वीस प्रकारच्या वाती-फुलवाती तयार करतात. त्यांच्या वस्तूंना फक्त शहरातच नाही तर राज्याबाहेरूनही मागणी आहे.
advertisement
Success Story : अनेक अडचणी आल्या, मात करत मायलेकीने केली यशस्वी मशरूम शेती, महिन्याला इतकी कमाई
आज त्यांच्या व्यवसायात पाच महिला काम करतात आणि महिन्याला जवळपास एक लाख रुपये उत्पन्न मिळतं. ज्योती म्हणतात, माझ्या पतीने मला खूप साथ दिली. त्यांनी नोकरी सोडून माझ्यासोबत काम सुरू केलं. आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसाय वाढवला. आज इतर महिलांना काम देता येतं, हेच आमचं खरं समाधान आहे.