मुंबई: स्मॉल-कॅप कंपनी कॅल्टन टेक सॉल्युशन्स (Kellton Tech Solutions) चे शेअर्स सोमवारी बाजारात चर्चेत राहण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे कंपनीचा नव्याने आखलेला फंडरेझिंग प्लॅन, ज्याअंतर्गत बोर्डाने 40 मिलियन अमेरिकन डॉलरपर्यंतचे फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉण्ड्स (FCCB) जारी करण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय शनिवारी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये घेण्यात आला असून, याबाबतची माहिती कंपनीने अधिकृतपणे स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगद्वारे दिली आहे.
advertisement
कॅल्टन टेकचा शेअर शुक्रवारी 21.95 वर बंद झाला होता. मागील एका महिन्यात हा शेअर सुमारे 8 टक्क्यांनी घसरला असला, तरी गेल्या सहा महिन्यांत त्यात सुमारे 3 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे, कारण मागील पाच वर्षांत त्याने 120 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
कंपनीची आर्थिक ताकद वाढणार
कंपनीने सांगितलं की, या इश्यूला शेअरहोल्डर्सची मंजुरी आधीच सप्टेंबरमधील वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मिळाली होती. आता बोर्डाने त्याच्या अंमलबजावणीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. कॅल्टन टेकने जाहीर केलं आहे की, बॉण्ड्स जारी करण्याची प्रक्रिया, संबंधित अटी, दस्तऐवजीकरण, वेळापत्रक आणि आवश्यक मंजुऱ्या मिळवण्याचं काम जसजसं पुढे जाईल, तसतसं एक्स्चेंजला नियमित अपडेट्स दिले जातील.
हा निर्णय कंपनीच्या जागतिक वाढीच्या धोरणाचा (Global Growth Strategy) एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डॉलरमध्ये कर्ज उभारल्याने कंपनीला परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात आणि नवीन तंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढवण्यात मदत होईल.
एआय पार्टनरशिपमुळे वाढली आंतरराष्ट्रीय ओळख
अलीकडेच कॅल्टन टेकला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) या जागतिक संस्थेने कंपनीला जनरेटिव आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अॅप्लिकेशन विकसित करून ते अंमलात आणण्याचं काम सोपवलं आहे.
या प्रकल्पाचा उद्देश डिजिटल इनोव्हेशन आणि मानवकेंद्री परिवर्तनाला (Human-Centric Transformation) प्रोत्साहन देणं हा आहे. ही भागीदारी कॅल्टन टेकच्या त्या प्रयत्नांचा भाग आहे. ज्यांत कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर समाजाच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करत आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO करनजीत सिंग) यांनी सांगितलं की, UNFPA सोबतचं हे सहकार्य दाखवून देतं की इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगभरात खरा आणि परिणामकारक बदल घडवता येतो.
