सोलापूर : अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतात. यामध्ये अनेक व्यवसाय असे असतात की ते सगळ्यांना माहिती असतात किंवा अगोदरच बाजारपेठेमध्ये असे व्यवसाय अस्तित्वात असतात. परंतु काही जण असे हटके व्यवसायाची निवड करतात आणि त्या व्यवसायात ते यशस्वी सुद्धा होतात. सोलापूर जिल्ह्यातील कृष्णदेव रोकडे यांनी अशाच हटके व्यवसायाची निवड केली आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले आहेत. त्यांनी स्वीट कॉर्नर विक्रीचा व्यवसाय सुरु केला असून यामधून लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
कृष्णदेव मधुकर रोकडे पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावी राहतात. कृष्णदेव रोकडे यांच्या शिक्षण नववीपर्यंत झालेले आहे. 2012 पासून कृष्णदेव राकडे हे स्वीट कॉर्न विक्री करण्याचा व्यवसाय करत आहेत. कृष्णदेव रोकडे यांनी 500 रुपयांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात या स्वीट कॉर्नरला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. हळूहळू करत स्वीट कॉर्न खाणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढत गेली.
स्टोन रोल, मोती अन् लेस घ्या होलसेल दरात, पुण्यातील प्रसिद्ध मार्केट माहितीये का?
आज कृष्णदेव रोकडे यांच्या शंभूराजे नाष्टा सेंटर येथे स्वीट कॉर्न खाण्यासाठी सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, अनगर, कामती, कुरुल येथून खवय्ये येतात. 500 रुपयांपासून सुरू केलेल्या या व्यवसायातून आता कृष्णदेव हे आता महिन्याला 40 ते 45 हजार रुपयांची कमाई करत आहेत. एका हॉटेलपासून त्यांनी स्वीट कॉर्न विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता तर आता त्याच एका हॉटेल वरून त्यांनी तीन हॉटेल केले आहेत आणि तिन्ही हॉटेलमध्ये स्वीट कॉर्नरची विक्री होत आहे. या तिन्ही हॉटेलमधून ते वर्षाला 13 ते 14 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
शिक्षण घेतलेल्या तरुणांनी नोकरीचा नाद सोडावा आणि कोणताही व्यवसाय सुरू करावा. नोकरीपेक्षा चार पैसे कमी मिळाले तरी चालेल पण स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असं कृष्णदेव रोकडे सांगतात.