कुमारने एम.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले, पण नोकरीच्या कोणत्या दारानेही हाक मारली नाही. नातेवाईकांकडून 60 हजार रुपये उधार घेऊन बलून डेकोरेशनचा छोटासा व्यवसाय सुरू केला. पहिला इव्हेंट एक साधा वाढदिवस. हळूहळू नाव पसरले. कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्द याने इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बस्तान जमले. अवघ्या दीड वर्षांत दोन कोटींची उलाढाल करून 25 लाखांचा नफा कुमारला मिळाला आहे. सोलापूरहून कर्नाटक, मुंबई, पुणे, हैदराबादपर्यंत इव्हेंट्स गाजवल्या. आज त्यांच्या कंपनीत 20 जणांना रोजगार मिळाला. 150 हून अधिक लग्न, वाढदिवस, समारंभ यशस्वी झाले.
advertisement
आईने एका कारखान्यात कष्ट करत असताना पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुमार दिवस-रात्र एक करत असून संपूर्ण भारतामध्ये व्यवसाय वाढवण्याचा निश्चय कुमार आलुरे या तरुणाने केला आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसेल तर हार न मानता संघर्ष करून प्रत्येक अडचणीवर मात करून पुढे गेल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला यशस्वी तरुण उद्योजक कुमार आलुरे यांनी दिला आहे.