advertisement

Agriculture News : हातात आलेलं पीक अवकाळीने गेलं, डोळ्यादेखत द्राक्षांचे 25 लाखांचे नुकसान, शेतकरी संकटात, Video

Last Updated:

शेतकरी मनोज शेळके यांनी पोटच्या मुलासारखी जपलेली चार एकर द्राक्ष बाग अवकाळी पावसाच्या दणक्याने उद्ध्वस्त झाली.

+
News18

News18

सोलापूर - मोहोळ तालुक्यातील येवली गावातील शेतकरी मनोज शेळके यांनी पोटच्या मुलासारखी जपलेली चार एकर द्राक्ष बाग अवकाळी पावसाच्या दणक्याने उद्ध्वस्त झाली. अचानक झालेल्या सरींमुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेळके यांचे जवळपास 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बेदाणे तयार करण्यासाठी शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या द्राक्षांचे नुकसान झाले आहे.
शेळके यांनी चार एकर क्षेत्रात द्राक्षबाग लावली होती. यासाठी त्यांना 10 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता. बेदाणे उत्पादनासाठी द्राक्षांची तोडणी करून शेतातील मोकळ्या शेडमध्ये ठेवली होती. दररोज चांगला सूर्यप्रकाश मिळत असल्याने बेदाणे तयार होण्याची प्रक्रिया चांगली चालू होती. मात्र, मंगळवारी पहाटे अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेडवर प्लास्टिक पेपर टाकता आला नाही. परिणामी, द्राक्ष भिजून नासावले. शेळके यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन बागेचे जतन केले होते, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
advertisement
या नुकसानीमुळे शेळके यांच्यासह परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला असून, सरकारी मदतीची अपेक्षा आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाईची तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : हातात आलेलं पीक अवकाळीने गेलं, डोळ्यादेखत द्राक्षांचे 25 लाखांचे नुकसान, शेतकरी संकटात, Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement