TRENDING:

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, जानेवारीचा हफ्ता या तारखेला खात्यात होणार जमा, तटकरेंची घोषणा

Last Updated:

Ladki Bahin Yojana 2025: जानेवारी महिना मध्यात आला तरीही लाभार्थी महिलांना  सातवा हफ्ता अजून मिळाला नाही. अखेरीस जानेवारी महिन्याचा हफ्ता हा...

advertisement
मुंबई : महायुती सरकारसाठी गेंमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) आता प्रत्येक महिन्याला उशीर करत असल्याचं समोर आलं. जानेवारी महिना मध्यात आला तरीही लाभार्थी महिलांना  सातवा हफ्ता अजून मिळाला नाही. अखेरीस जानेवारी महिन्याचा हफ्ता हा २६ जानेवारीला वितरण होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
advertisement

आतापर्यंत महिलांच्या खात्यात सहा हप्ते जमा झाले आहेत.जानेवारी महिन्यात सातवा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, याबद्दल सरकारकडून कोणतीची माहिती समोर आली नव्हती. संक्रातीच्या मुहूर्तावर हा हप्ता जमा होणार,अशी चर्चा होती. यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार होती. मात्र महिलांच्या खात्यात अद्याप पैसेच आलेच नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात कडू झाली. त्याचसोबत आता 1500 रूपयांसाठी आणखीण किती दिवस वाट पाहावी लागणार? असा प्रश्न लाडक्या बहिणी उपस्थित होतं होता.

advertisement

अखेरीस , जानेवारी महिन्याचा हफ्ता हा २६ जानेवारीच्या आधी देणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. १५०० रुपयांचा हा हफ्ता आहे.

"लाडक्या बहिणीच्या जानेवारी महिन्याचा लाभ आहे. तो २६ जानेवारीला वितरणास सुरुवात होईल. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये त्याचं वाटप पूर्ण होईल, लाभार्थी महिल्यांच्या खात्यात पैसे जमा होतील" अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.

advertisement

महिलांच्या अर्जाची छाननी सुरू

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे. त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत, ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे. त्या या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, जानेवारीचा हफ्ता या तारखेला खात्यात होणार जमा, तटकरेंची घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल