किती रुपयांनी वाढला गॅस सिलिंडर
एक एप्रिलची सकाळ व्यावसायिक आणि हॉटेल चालकांसाठी मोठा दणका देणारी बातमी ठरली आहे. आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरात तब्बल १९५.५० रुपयांची वाढ केली. आधीच महागाई वाढली असताना आता या झळा आणखी तीव्र बसण्याची शक्यता आहे.
advertisement
सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. १९-किलोग्रामच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात २१८ रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्लीत सिलेंडरची किंमत १९४ रुपये, चेन्नईत २०३ रुपये, मुंबईत १९६ रुपये आणि कोलकातामध्ये २१८ रुपये असेल. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
या दरवाढीनंतर, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता २०७८.५० रुपये झाली आहे. यापूर्वी तो १,८८४.५० रुपयांना उपलब्ध होता. कोलकातामध्ये १९-किलोग्राम सिलेंडरची किंमत २२०८ रुपये, मुंबईत २०३१ रुपये आणि चेन्नईत २२४६.५० रुपये झाली आहे. पाटणामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ₹2365 आणि जयपूरमध्ये ₹2031 पर्यंत वाढली आहे.
आणखी महागाई वाढणार
महिन्याभराच्या अंतरात झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. यापूर्वी १ मार्च रोजी कमर्शियल सिलिंडर ११४.५ रुपयांनी वाढ केली होती. आता झालेल्या दरवाढीनंतर, देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २,०७८.५० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. हॉटेल, केटरर्स आणि छोट्या दुकानदारांसाठी हा मोठा आर्थिक बोजा ठरणार आहे, ज्याचा परिणाम पर्यायाने बाहेरच्या जेवणाच्या दरांवर होऊ शकतो.
गृहिणींना मोठा दिलासा
व्यावसायिक सिलिंडरचे दर आकाशाला भिडले असले तरी, गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरमध्ये ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्यानंतर सध्या दिल्लीत हा सिलिंडर ९१३ रुपयांना मिळत असून तीच किंमत कायम ठेवण्यात आली आहे.
का वाढतात किंमती
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती सुमारे ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलनाच्या दरांचा आढावा घेऊन एटीएफ आणि एलपीजीच्या किमती ठरवतात. जागतिक बाजारातील याच अस्थिरतेचा फटका आता भारताच्या मार्केटला बसला आहे.
