जयपूर: राजस्थानमधून एक अशी बातमी समोर आली आहे ज्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे. बांसवाडा जिल्ह्यातील घाटोल क्षेत्रातील कांकरिया गावात सोन्याच्या प्रचंड साठ्याचा शोध लागला आहे. अधिकृत पुष्टी मिळाल्यानंतर हे ठिकाण आता “राजस्थानचा सोन्याचा गड” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
advertisement
सोने हे भारतात केवळ दागिन्यांसाठीच नाही, तर गुंतवणुकीसाठी देखील लोकांची पहिली पसंती राहिली आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या भागात सोन्याची खान सापडते, तेव्हा ती संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी मोठी बातमी ठरते. कांकरिया गावात सापडलेला हा साठा तसा छोटा नाही अंदाजानुसार येथे सुमारे 222 टन शुद्ध सोने आहे. इतकंच नाही तर 3 किलोमीटरच्या परिसरात 11 कोटी टनांहून अधिक Gold Ore असल्याचा अंदाज भूवैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
या भागात ही तिसरी सोन्याची खान सापडली आहे. याआधी बांसवाडा जिल्ह्यातील जगपुरिया आणि भुकिया या ठिकाणीही सोन्याच्या खाणींची पुष्टी झाली होती. त्यामुळे आता बांसवाडा जिल्हा भारताच्या सोन्याच्या नकाशावर ठळकपणे झळकू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही वर्षांत हा जिल्हा देशाच्या एकूण सोन्याच्या मागणीपैकी सुमारे 25 टक्के पुरवठा करण्याची क्षमता ठेवेल.
भारतामधील सर्वात मोठे सोन्याचे साठे असलेले राज्ये
बिहार: देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा बिहार राज्याकडे आहे
जमुई जिल्ह्यात एकूण सोन्याच्या अयस्क साठ्यापैकी सुमारे 44 टक्के हिस्सा आहे. म्हणजेच सुमारे 222.8 दशलक्ष टन.
राजस्थान: दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे
येथे अंदाजे 125.9 दशलक्ष टन सोन्याचे साठे आहेत.
कर्नाटक: तिसऱ्या स्थानावर
या राज्यात 103 दशलक्ष टन सोन्याचे साठे आहेत.
आंध्र प्रदेश: चौथ्या क्रमांकावर
येथे अंदाजे 15 दशलक्ष टन सोने आहे.
उत्तर प्रदेश: पाचव्या स्थानावर
या राज्यात 13 दशलक्ष टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे आणि सोनभद्र जिल्हा हे त्याचे प्रमुख केंद्र आहे.
राजस्थानमधील या नव्या शोधामुळे भारताच्या सोन्याच्या उत्पादन क्षमतेला मोठा हातभार मिळणार आहे. बांसवाडा जिल्ह्यातील ही नवी खान केवळ आर्थिक विकासासाठीच नव्हे, तर रोजगार आणि स्थानिक उद्योगांसाठी देखील मोठी संधी निर्माण करणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हा शोध देशातील खाण उद्योगासाठी "कुबेराचा खजिना" ठरू शकतो.
