चेकवर हे 23 क्रमांक चार वेगवेगळ्या भागांत लिहिलेले असतात. या 23 पैकी पहिला 6 अंकी क्रमांक तुमचा चेक नंबर सांगतो. प्रत्येक चेकवर हा क्रमांक वेगळा असतो. उदाहरणार्थ, जर चेकवर 000042 असेल तर पुढील चेकवर 000043 होईल. तुम्ही एखाद्याला चेक दिल्यास किंवा घेतल्यास, हा चेक क्रमांक लिहून घ्यायला हवा. चेक हरवला किंवा खात्यात पैसे जमा न झाल्यास, तुम्ही या नंबरवरून चेकच्या स्टेटसबद्दल माहिती मिळवू शकता.
advertisement
दुसऱ्या भागात 9 अंक लिहिलेले असतात. तो MICR कोड म्हणजेच मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्नायझेशन कोड आहे. हा नंबर तीन वेगवेगळ्या भागांत विभागला जातो. यामुळे चेक जारी झालेलं शहर, बँक आणि शाखेची माहिती मिळते. एकप्रकारे, हा तुमच्या बँकेच्या शाखेचा पत्ता आहे. MICR कोडचे पहिले तीन अंक सिटी कोड आहेत. त्यात तुमच्या शहराच्या पिन कोडचे फक्त पहिले तीन अंक असतात. हा नंबर पाहून तुमचा चेक कोणत्या शहरातून आला आहे हे कळू शकते. पुढील तीन अंक बँकेचा युनिक कोड असतो. या कोडद्वारे तुम्ही बँकेची माहिती शोधू शकता. शेवटचे तीन अंक शाखा कोड असतात. प्रत्येक बँकेच्या शाखेचा स्वतंत्र शाखा कोड असतो. हा कोड बँकेशी संबंधित प्रत्येक व्यवहारात वापरला जातो.
तिसर्या भागात छापलेले 6 अंक दर्शवतात की तुमचं अकाउंट आरबीआयद्वारे मेंटेन केलं जातं. जेव्हा चेक आरबीआयकडे प्रोसेसिंगसाठी जातो तेव्हा हा नंबर मदत करतो. शेवटचे 2 अंक हे ट्रॅन्झॅक्शन कोड असतात. ते चेक करंट अकाउंटचा आहे की सेव्हिंग अकाउंटचा, हे दर्शवतात.
