अयोध्या टेम्पल ट्रस्टपासून विश्व हिंदू परिषदेपर्यंत दिवाळी 31 ऑक्टोबरलाच साजरी होईल, असा विश्वास आहे. दरम्यान, शेअर बाजारात दिवाळीची सुट्टी शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणेच 'मुहूर्त ट्रेडिंग'ही त्याच दिवशी होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी शेअर बाजार कोणतेही मुहूर्त ट्रेडिंग होणार नाही. हा दिवस रोजच्या सारखा असणार आहे.
Diwali 2024 Bank Holidays: 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी बंद असणार बँक?
advertisement
दिवाळी निमित्ताने NSE आणि BSE द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची तारीख 1 नोव्हेंबर असेल. मुहूर्त ट्रेडिंग खास संध्याकाळी 6 ते 7 या एक तासाच्या वेळेत असणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार एक तास उघडतो आणि विशेष ट्रेडिंग होते. हे हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्ष, संवत 2081 ची सुरुवात समजली जाते.
लक्ष्मीपूजन मुहूर्त कधी?
ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी संपेल. उदया तिथी आणि प्रदोष काळानुसार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन साजरं होईल. 1 नोव्हेंबरला प्रदोष काळ संध्याकाळी 5 वाजून 36 मिनिटांपासून 8 वाजून 11 मिनिटांपर्यंत असेल, तर वृषभ काळ संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून 8 वाजून 15 मिनिटांपर्यंत असेल. यात लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 5:36 वाजल्यापासून 6:15 वाजेपर्यंत असेल.