TRENDING:

Dabba Trading: कांदिवलीतून डब्बा ट्रेडिंग रॅकेटचा पर्दाफाश, 80 लाखांसह 3 आरोपींना बेड्या

Last Updated:

मुंबई गुन्हे शाखेने कांदिवलीत डब्बा ट्रेडिंग रॅकेट उघड केले. तीन स्टॉक ब्रोकर्स अटकेत, 80 लाखांची फसवणूक. सेबीच्या माहितीवरून कारवाई, तपास सुरू.

advertisement
आजकाल शेअर मार्केटमध्ये सुळसुळाट चालू झाला आहे. जिकडे तिकडे कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. तुम्ही या डब्बा ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकला नाहीत ना? जरा सावध राहा, झटपट पैसे कमवण्याच्या नादात तुम्ही फसू शकता आणि आयुष्यभराची कमाई लुबाडली जाऊ शकते. मुंबईच्या गुन्हे शाखेने शहरात चालणाऱ्या 'डब्बा ट्रेडिंग' अर्थात बेकायदेशीर शेअर बाजाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
News18
News18
advertisement

बोरिवली-कांदिवलीतून तिघांना बेड्या

कांदिवली येथील एका फ्लॅटमधून तीन बडे स्टॉक ब्रोकर्स हे अवैध पद्धतीने शेअर बाजाराचे व्यवहार चालवत होते. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली असून, या घटनेमुळे शेअर मार्केट क्षेत्रात खळबळ उडाली. कांदिवली आणि बोरिवली इथल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिघेही बेकायदेशीरपणे ट्रेडिंग करत होते.

डब्बा ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय करत होते?

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी सेबीकडून कोणताही परवाना न घेता, NSE/MCX च्या प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीरपणे ट्रेडिंग करत होते. आरोपींवर फसवणूक, IT Act आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केला. मॅजिस्ट्रेट कोर्टाने या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. धक्कादायक बाब म्हणजे, सेबीनेच या संपूर्ण प्रकरणाची मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. सूत्रांनुसार, हे रॅकेट गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत होते.

advertisement

पोलिसांनी जप्त केले सामान

एका विशिष्ट माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने कांदिवलीतील वदारकेश कोऑपरेटिव्ह सोसायटी येथे धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आणि कॉम्प्युटर, मोबाइल फोन, रोख 43,900 रुपये आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले. ही धाड टाकताना NSE/MCX चे अधिकारी, कॉम्प्युटर तज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तपासणीदरम्यान, पथकाला फ्लॅटमध्ये काही लोक कॉम्प्युटरवर सक्रियपणे ट्रेडिंग करताना आढळले. हे आरोपी ग्राहकांच्या सूचनांनुसार खरेदी-विक्रीचे ऑर्डर बेकायदेशीरपणे देत होते.

advertisement

पोलिसांच्या अंदाजानुसार, या अवैध ट्रेडिंगशी संबंधित फसवणुकीची रक्कम सुमारे 80 लाख रुपये आहे. तपासकर्त्यांनी या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या जॅक उर्फ राजू नावाच्या आणखी एका आरोपीचा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचा उल्लेख केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अनधिकृत ट्रेडिंग पोर्टल्स आणि चॅनेलच्या विरोधात चालवल्या जाणाऱ्या व्यापक तपासाचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. अशा पोर्टल्सचा वापर किरकोळ गुंतवणूकदारांना लक्ष्य करण्यासाठी आणि ऑफ-मार्केट व्यवहार करण्यासाठी केला जातो.

advertisement

सध्या जप्त केलेल्या डेटा आणि मोबाइल डिव्हाईसच्या फॉरेन्सिक तपासणीचे काम सुरू आहे. या तपासणीतून सहभागी ग्राहक कोण होते, या व्यवहारातून निधीचा ओघ कसा झाला आणि या नेटवर्कचा पूर्ण विस्तार किती मोठा आहे, हे स्पष्ट होईल. तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यकतेनुसार सायबर कायदे आणि वित्तीय नियमांनुसार अतिरिक्त अटक किंवा गुन्हे दाखल केले जातील, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या/मनी/
Dabba Trading: कांदिवलीतून डब्बा ट्रेडिंग रॅकेटचा पर्दाफाश, 80 लाखांसह 3 आरोपींना बेड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल