मुंबई : लॉकडाऊननंतर अनेकांनी व्यवसाय करण्याला प्राधान्य दिल आहे. तेव्हा सुरू केलेले अनेक व्यवसाय आता भरभराटीला आलेले आहेत. दादर स्थानकापासून पासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या फूड माफिया इथे तुम्हाला चविष्ट चिकन पाव मिळतील. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी उपलब्ध आहेत.
जितेंद्र वाघेला या दादरकर तरुणाने लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर या व्यवसायाला सुरुवात केली होती. सुरुवातीला वडापावचा व्यवसाय यांनी सुरू केला परंतु या व्यवसायातून खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे, काहीतरी वेगळं करावं असा विचार त्यांनी केला आणि इथूनच फूड माफियाला सुरुवात झाली.
advertisement
शिक्षण नववी पास, 500 रुपयांत सुरू केला व्यवसाय, स्वीट कॉर्न विक्रीतून 13 लाखांची उलाढाल
या फूड माफियामध्ये तुम्हाला बटर चिकन पाव फक्त तीस रुपयांपासून आणि यासोबतच स्पेशल बटर चिकन पाव, बटर चीज चिकन पाव, स्पेशल बटर चिकन पाव, फूड्स माफिया स्पेशल किंग चिकन पाव, अंडा रोल, चीज अंडा रोल, स्पेशल चिकनअंडा रोल, चिकन स्टिक, चिकन फ्राय मोमोज असे 15 हून व्हरायटी उपलब्ध आहे. यांच्या इथे मिळणाऱ्या स्पेशल बटर चिकन पावमध्ये चिकनचे मोठे पिसेस त्यासोबतच सॉसेस सुद्धा भरून टाकलेले असतात. या दुकानात तुम्हाला फक्त 30 रुपयांपासून इथे चिकन पाव खायला मिळेल. लॉकडाऊनमध्ये स्टार्टअप म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आता महिन्याभरात त्यांना 1 लाखांच्या वरती कमाई करून देत आहे.
'लॉकडाऊनमध्ये माझी नोकरी गेली आणि म्हणूनच मी व्यवसाय करण्याच ठरवलं. मी पहिल्यापासूनच चांगला कुक होतो म्हणूनच अनेकांनी मला काहीतरी वेगळं करण्याचा सल्ला दिला. घरी मी चिकन मसाला बनवायचो त्यातूनच प्रेरणा घेऊन मग मी पावासोबत चिकन मसाला ट्राय करण्याच ठरवलं. आणि आज माझ्या या फूड्स माफियाला दादरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.'असे जितेंद्र वाघेला यांनी सांगितले.
दादर पूर्व स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या गौतमनगर येथे हे डीएमजेडब्ल्यू फूड माफिया याचे फूड स्टॉल लोकेटेड असून तुम्हाला जर नॉनव्हेज मध्ये काहीतरी युनिक ट्राय करायचं असेल तर नक्की इथे भेट द्या.