म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दोन महत्त्वाचे घटक असतात – कमी खर्च (Expense Ratio) आणि जास्त परतावा (High Returns). कमी खर्च असलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त नफा मिळू शकतो, कारण कमी शुल्काचा थेट परिणाम अंतिम परताव्यावर होतो.
जर तुम्ही कमी खर्चात जास्त परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड्सच्या शोधात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला पाच अशा म्युच्युअल फंड्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या पाच वर्षांत शानदार परतावा दिला आहे आणि त्यांचा खर्चही तुलनेत कमी आहे.
advertisement
टॉप 5 कमी खर्चात उच्च परतावा देणारे म्युच्युअल फंड्स
1. क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund)
Expense Ratio: 0.68%
पाच वर्षांचा परतावा: 42.68%
2. क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Quant Infrastructure Fund)
Expense Ratio: 0.75%
पाच वर्षांचा परतावा: 35.27%
3. ICICI प्रूडेंशियल कमोडिटीज फंड (ICICI Prudential Commodities Fund)
Expense Ratio: 1.04%
पाच वर्षांचा परतावा: 35.20%
4. बंधन स्मॉल कॅप फंड (Bandhan Small Cap Fund)
Expense Ratio: 0.46%
पाच वर्षांचा परतावा: 34.45%
5. ICICI प्रूडेंशियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड (ICICI Prudential Infrastructure Fund)
Expense Ratio: 1.16%
पाच वर्षांचा परतावा: 31.99%
कमी खर्चात जास्त परतावा मिळवण्याची सुवर्णसंधी!
जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर Expense Ratio कमी आणि परतावा जास्त असलेल्या म्युच्युअल फंड्सची निवड करणे फायद्याचे ठरेल. मात्र, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.