नियम काय आहे?
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गुंतवणूकदाराला नॉमिनी घोषित करावा लागेल. ही बाब गुंतवणूकदाराच्या पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर्सकडून केली जाऊ शकत नाही. नॉमिनी एक तर अन्य नॉमिनीजसह जॉइंट अकाउंट होल्डर्स म्हणून राहू शकतात किंवा आपल्याशी संबंधित हिश्श्यासाठी वेगवेगळी सिंगल अकाउंट्स किंवा फोलिओ उघडू शकतात.
नॉमिनीला असेट्स ट्रान्स्फर करण्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स लागतील?
advertisement
- मृत्यू झालेल्या गुंतवणूकदाराच्या डेथ सर्टिफिकेटची सेल्फ-अटेस्टेड कॉपी
- नॉमिनीचं केवायसी पूर्ण असणं, अपडेटेड असणं आणि त्याची पुन्हा खात्री केलेली असणं गरजेचं आहे.
- क्रेडिटर्सचा ड्यू डिस्चार्ज
गुंतवणूकदारांना द्यावे लागतील हे तपशील
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गुंतवणूदारांना आता आपल्या नॉमिनीविषयी अधिक माहिती द्यावी लागेल. त्यात ओळख पटवणाऱ्या तपशीलांचा समावेश आहे. उदा. नॉमिनीचा पॅन, ड्रायव्हिंग लायसेन्स नंबर किंवा त्याच्या आधार क्रमांकातले शेवटचे चार अंक. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांना नॉमिनीचे काँटॅक्ट डिटेल्स द्यावे लागतील आणि ते आपल्याशी कशा प्रकारे संबंधित आहेत, याचीही माहिती द्यावी लागेल.
नॉमिनी अपडेट कसे करायचे?
नॉमिनेशन फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारांनी जमा करता येतो. ऑनलाइन सबमिशनसाठी संस्था डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट किंवा आधार आधारित इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्सच्या माध्यमातून सादर केलेलं नॉमिनेशन स्वीकारतील. त्याशिवाय, गुंतवणूकदारांना प्रत्येक नॉमिनेशन सबमिशन केल्यानंतर एक रिसीट मिळेल. त्यामुळे पूर्ण प्रक्रियेतली पारदर्शकता दिसेल. रेग्युलेटेड संस्थांना अकाउंट किंवा फोलिओ ट्रान्स्फरनंतर आठ वर्षांपर्यंत नॉमिनी आणि रिसीटचं रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे.