TRENDING:

म्युच्युअल फंडमध्ये एकदम पैसे लावणं चांगलं की SIP, टॉपअप करावं की पैसे काढावे?

Last Updated:

एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याची रक्कम वेळोवेळी वाढवली नाही, तर जमा केलेल्या रकमेची वाढण्याची क्षमता कमी होऊ शकते, याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात.

advertisement
आर्थिकदृष्ट्या भविष्य सुरक्षित करायचं असेल, तर नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध गुंतवणूक अत्यावश्यक असते. त्यामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा तो एक सोपा मार्ग आहे. एसआयपीच्या माध्यमातून ठरावीक दिवसांच्या अंतराने एक निश्चित रक्कम गुंतवता येते. शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या चढ-उतारांचा ताण न घेता यात आर्थिक उद्दिष्टं पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियमित गुंतवणूक करता येते.
एसआयपी
एसआयपी
advertisement

AMFIच्या संयुक्त विद्यमाने म्युच्युअल फंड्स सही हैं आणि न्यूज 18 नेटवर्क यांच्यातर्फे 'निवेश का सही कदम' ही मोहीम चालवली जाते. त्याअंतर्गत आर्थिक उद्दिष्टपूर्तीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जातं. आमचा असा सल्ला आहे, की अतिरिक्त एसआयपी टॉप अप हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. अनेक गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याबद्दल जाणतात; मात्र वेळोवेळी एसआयपी टॉप अप म्हणजे एसआयपीची रक्कम वाढवण्याबद्दल फारच कमी जणांना माहिती आहे. या लेखातून एसआयपीबद्दल जाणून घेऊ या. तसंच, टॉप अपबद्दलही जाणून घेऊ या.

advertisement

एसआयपी म्हणजे काय?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी हा गुंतवणुकीचा एक व्यवस्थित आणि नियमित मार्ग आहे. या माध्यमातून म्युच्युअल फंडात दैनिक, मासिक, साप्ताहिक, त्रैमासिक अशा ठरावीक काळाने नियमितपणे रक्कम गुंतवता येते. याची प्रक्रिया खूप सोपी आहे. गरजेनुसार या पैशांचा वापर करता येतो. गुंतवणुकीच्या बाबतीत नवे असलात, तर छोट्या रकमेपासून सुरुवात करता येऊ शकते. यातून अगदी छोट्या रकमेची गुंतवणूकही काही वर्षांनंतर चांगला परतावा देऊ शकते. एसआयपीमुळे आर्थिक उद्दिष्टांप्रति शिस्त येते. तसंच, शेअर मार्केटमध्ये चढ-उतार असले तरी नुकसान कमीत कमी राखण्याचं काम यातून होतं.

advertisement

एसआयपी टॉप-अप हा पुढचा टप्पा का?

आपलं उत्पन्न वाढल्यानंतर एसआयपीच्या रकमेत वाढ करणं म्हणजे एसआयपी टॉप अप. अनेक गुंतवणूकदार एका ठरावीक रकमेची एसआयपी सुरू करतात आणि अनेक वर्षं ती रक्कम तेवढीच ठेवतात. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याची रक्कम वेळोवेळी वाढवली नाही, तर जमा केलेल्या रकमेची वाढण्याची क्षमता कमी होऊ शकते, याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात.

advertisement

एसआयपी टॉप-अप का करायला हवी?

- एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याची रक्कम वेळोवेळी वाढवण्याचा सर्वांत मोठा फायदा हा आहे, की वाढत्या महागाईच्या काळात आपल्याला एक पाऊल पुढे राहता येतं. दररोज आपले खर्च वाढत जातात. या तुलनेत गुंतवणूक रक्कम स्थिर राहिली, त्यात वाढ झाली नाही, तर गुंतवणुकीतून मिळणारा परतावा भविष्यातल्या आपल्या गरजांसाठी पुरणार नाही, अशी शक्यता आहे. एसआयपीची रक्कम वाढवून आपल्याला बिनधास्त राहता येऊ शकतं. भविष्यातल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि खरेदी करण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी ते आवश्यक आहे.

advertisement

- कंपाउंडिंग अर्थात चक्रवाढ दराची जादू गुंतवणुकीसाठी पैसे जास्त असतील, तेव्हा उत्तम पद्धतीने काम करते. उत्पन्न वाढतं, त्यानुसार एसआयपीत गुंतवणूक वाढवली, तर उत्तम परतावा मिळवू शकता. आपले पैसे वेगाने वाढू शकतात. त्यामुळे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हातभार लागू शकतो.

- बदलत्या काळानुसार आर्थिक उद्दिष्टंही वाढत जातात. त्यामुळे स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणुकीची पद्धतही बदलायला हवी. त्यासाठी एसआयपी गुंतवणूक वेळोवेळी वाढवणं, पोर्टफोलिओ मजबूत करणं गरजेचं आहे. त्यामुळे गुंतवणुकीची रणनीती न बदलताही आपली आर्थिक उद्दिष्टं पूर्ण करण्याच्या दिशेने आपण पुढे पावलं टाकू शकतो.

- उत्पन्न वाढल्यावर जीवनशैली त्यानुसार करणं सोपं आहे; मात्र उत्पन्न वाढल्यावर ते वाढलेले सारे पैसे दैनंदिन गरजांवर खर्च करू नयेत, असं आर्थिक सल्लागार सांगतात. अतिरिक्त पैशांमधला एक वाटा कायम बचत आणि गुंतवणुकीसाठी ठेवला पाहिजे. एसआयपीमध्ये गुंतवणूक वाढवणं हा त्याचा चांगला मार्ग आहे.

एसआयपी टॉप अप ही एक अशी सुविधा आहे, की थोड्या काळानंतर एसआयपीसाठी निश्चित केलेल्या रकमेत आपोआप (ऑटोमॅटिक) काही वाढ करता येते. ही वाढ आपल्या सोयीनुसार काही महिन्यांनी किंवा वर्षाने करता येते. त्यामुळे दर वेळी ही गोष्ट मॅन्युअली करावी लागत नाही. उत्पन्न वाढल्यानंतर गुंतवणूकही आपोआप वाढत जाते.

जितक्या लवकर हे सुरू केलं जाईल, तितकं फायद्याचं ठरतं. आधीपासूनच एसआयपीत गुंतवणूक करत असलात, तर एसआयपी टॉप अपसाठी हाच काळ योग्य आहे. आपली बचतीची सवय अधिक चांगली करा आणि आजपासूनच एसआयपी टॉप अपची सुरुवात करा. त्यामुळे तुमचे पैसे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढतील.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं यात शेअर बाजाराची जोखीम आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रं नीट वाचा. एनएव्हीवर वेगवेगळ्या कारणांमुळे परिणाम होत असतो. त्यात व्याजदरांमध्ये चढ-उतार होत असतात. एखाद्या फंडाने आधी जशी कामगिरी केली, तशीच भविष्यात होईल, याची खात्री देता येत नाही. तसंच, कोणत्याही लाभांशाची गॅरंटी म्युच्युअल फंड देत नाही. हा परतावा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय यात गुंतवणूक करू नये.

मराठी बातम्या/मनी/
म्युच्युअल फंडमध्ये एकदम पैसे लावणं चांगलं की SIP, टॉपअप करावं की पैसे काढावे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल