एसआयपीचे सलग तीन हप्ते चुकले, तर दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक एसआयपी आपोआप रद्द होऊ शकते. त्रैमासिक, द्वैमासिक किंवा दीर्घकालीन एसआयपी दोन हप्ते चुकल्यावर रद्द होते.
एसआयपीचा हप्ता चुकला, तर दंड भरावा लागत नाही; मात्र एसआयपीच्या हप्त्याइतके पैसे खात्यात नसले, तर बँकेकडून पेनल्टी लागू शकते. खात्यात पुरेसे पैसे नसल्याबद्दल बँका 150 ते 750 रुपयांपर्यंत पेनल्टी आकारू शकतात. प्रत्येक बँकेनुसार ही पेनल्टी वेगळी असू शकते.
advertisement
एसआयपीचा हप्ता चुकला, तर आर्थिक उद्दिष्टांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजाराच्या हालचालींनुसार रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंगची संधी गमावली जाते. चुकलेल्या प्रत्येक हप्त्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम कमी होत जाते. त्यामुळे काळानुसार चक्रवाढ व्याजाने संपत्ती वाढण्यावर परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी भविष्यात अधिक गुंतवणूक करावी लागू शकते.
एसआयपीचा हप्ता भरणं शक्य नाही असं वाटण्याइतकी आर्थिक परिस्थिती बिघडली असली, तर एसआयपी बंद करण्याऐवजी पॉझ करू शकता. काही काळ पॉझ केल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्यावर एसआयपी पुन्हा सुरू करता येऊ शकते.
आणखी एक उपाय म्हणजे एसआयपीचे हप्ते वेळेवर भरता यावेत म्हणून एसआयपीची रक्कम छोटी ठेवावी. मोठी रक्कम रेग्युलर मेन्टेन करणं काही वेळा कठीण होऊ शकतं. छोट्या रकमेची एसआयपी सुरळीतपणे चालवणं सोपं असतं. छोट्या रकमेच्या अनेक एसआयपी एका वेळीही चालवता येऊ शकतात.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पगार आल्यानंतर महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक खर्चांची तरतूद करावी. एसआयपीच्या हप्त्याची तारीखही पगार जमा होण्याच्या तारखेनंतर लगेचची ठेवावी. त्यामुळे हप्ता लगेचच निघून जाईल आणि उर्वरित पैशांत बाकीचे खर्च मॅनेज करता येतील