TRENDING:

Success Story : 3 प्रकारच्या बनवतात घोंगडी, नवनाथ यांचा पारंपरिक व्यवसाय भारीच, महिन्याला 1 लाखांची उलाढाल

Last Updated:

नवनाथ कुचेकर यांचा पारंपरिक घोंगडी बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आला आहे.

advertisement
पुणे: बारामतीतील नवनाथ कुचेकर यांचा पारंपरिक घोंगडी बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. कुचेकर यांनी तयार केलेल्या घोंगड्यांना राज्यभरातून मागणी असते. या व्यवसायातून महिन्याला लाखोंची उलाढाल होते. आज नवनाथ कुचेकर यांचा व्यवसाय फक्त उत्पादनापुरता मर्यादित नसून, तो संस्कृती जपणारा आहे. त्यांच्या घोंगड्यांमागील मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाचा एकत्रित प्रयत्न यामुळे हा व्यवसाय आजही यशस्वी आहे. त्यांच्या पारंपरिक व्यवसायाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement

नवनाथ कुचेकर यांनी सांगितले की, घोंगडी बनवण्याचा व्यवसाय अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आणि याला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांचे कुटुंब महिन्याला तब्बल 50 ते 60 घोंगड्या तयार करतात. काळ्या, ग्रे आणि पांढऱ्या रंगाच्या अशा तीन प्रकारच्या घोंगड्यांची निर्मिती केली जाते. हे घोंगडे विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात अतिशय उपयुक्त ठरतात. या व्यवसायातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. महिन्याला तब्बल 1 लाखांची उलाढाल होते, खर्च जाऊन 60 ते 70 हजार निव्वळ मिळतो. तर सीझनमध्ये उत्पन्नात चांगली वाढ होते.

advertisement

घोंगडी कशी बनवली जाते?

घोंगडी बनवण्याचे काम आधी लोकर गोळा करण्यापासून सुरू होते. मेंढीची लोकर आणल्यानंतर ती नीट धुवून स्वच्छ केली जाते आणि उन्हात वाळवली जाते. नंतर लोकर मोकळी करून मऊ केली जाते. त्यानंतर त्या लोकरीपासून धागा कातला जातो. तयार झालेला धागा हातमागावर विणून घोंगडी तयार केली जाते. घोंगडी विणून झाली की तिच्या कडा नीट करून फिनिशिंग दिली जाते आणि मग ती विक्रीसाठी तयार केली जाते.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : 3 प्रकारच्या बनवतात घोंगडी, नवनाथ यांचा पारंपरिक व्यवसाय भारीच, महिन्याला 1 लाखांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल