TRENDING:

Nirmala Sitharaman : बजेट ऐतिहासिक, लूक क्लासिक! अर्थसंकल्पाआधीच निर्मला सीतारमण यांच्या साडीची चर्चा, VIDEO

Last Updated:

Nirmala Sitharaman Saree: निर्मला सीतारामन यांनी सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर करत मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडला, कांजीवरम कट्टम साडीने तामिळनाडूच्या विणकाम वारशाचा गौरव केला.

advertisement
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर करून माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडीत काढणार आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी अर्थमंत्र्यांनी केवळ आकडेवारीचा खेळ मांडला नाही, तर भारताच्या समृद्ध हस्तकला परंपरेचे दर्शनही घडवले. अर्थमंत्र्यांनी आज परिधान केलेली गडद जांभळ्या रंगाची 'कट्टम' कांजीवरम सिल्क साडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
News18
News18
advertisement

तामिळनाडूचा वारसा आणि 'कट्टम' डिझाइन

निर्मला सीतारामन यांचा पेहराव नेहमीच भारतीय विणकाम परंपरेला दाद देणारा असतो. त्यांची प्रत्येक बजेटदरम्यानची साडी खूप खास होती. यंदाही त्यांनी लोकल ते वोकलसाठी संदेश देणारी साडी नेसली आहे. आज त्यांनी तामिळनाडूच्या विणकाम वारशाचा अभिमान सांगणारी हातमागावरील कांजीवरम साडी नेसली. या साडीवर 'कट्टम' म्हणजेच चौकटींची (Checks) वैशिष्ट्यपूर्ण नक्षी होती. जांभळ्या रंगासोबतच त्याला असलेली सोनेरी झरी बॉर्डर आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देते.

advertisement

advertisement

साडीची अंदाजे किंमत किती?

कांजीवरम साड्या त्यांच्या शुद्ध रेशीम आणि सोन्या-चांदीच्या जरकामासाठी जगप्रसिद्ध आहेत. फॅशन तज्ज्ञांच्या मते, अर्थमंत्र्यांनी परिधान केलेली ही साडी हातमागावरील प्रकारातील असून, तिची गुणवत्ता आणि त्यावरील पारंपारिक जरकाम पाहता तिची किंमत साधारणतः ३५,००० ते ७०,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. यामध्ये जेवढ्या व्हरायटी किंवा सिल्क किंवा बुट्टी डिझाइन वाढत जाते तेव्हा त्या साडीची किंमतही तेवढीच वाढत जाते. डिझाइन आणि रंगाच्या दुर्मीळतेनुसार ही किंमत त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

advertisement

भारतीय हातमागाला पाठिंबा

गेल्या काही वर्षांत निर्मला सीतारामन यांनी ओडिसाची संबलपुरी, धारवाडी कसूती आणि आता कांजीवरम अशा विविध प्रांतीय साड्यांमधून भारतीय विणकरांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आजही संसदेत प्रवेश करताना त्यांच्या हातातील डिजिटल बजेट असलेलं टॅब आणि ही पारंपारिक साडी यांचा मेळ आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम दर्शवत होता.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Nirmala Sitharaman : बजेट ऐतिहासिक, लूक क्लासिक! अर्थसंकल्पाआधीच निर्मला सीतारमण यांच्या साडीची चर्चा, VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल