TRENDING:

रेखा झुनझुनवाला यांनी मोठा दाव कुठे लावला? फक्त काही मिनिटांत 67 कोटींचा नफा; मार्केटमध्ये कुजबुज सुरू, तज्ज्ञही गोंधळले!

Last Updated:

Share Market: दिवाळीच्या दिवशी रेखा झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीला सोन्याची किनार लाभली. फेडरल बँकेच्या शेअरने झेप घेताच काही मिनिटांतच त्यांना तब्बल 67 कोटी रुपयांचा नफा झाला.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना मोठा नफा झाला आहे. सोमवार 20 ऑक्टोबर रोजी बाजार उघडताच फेडरल बँकेचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर पोहोचले. ज्यामुळे रेखा झुनझुनवाला यांना काही मिनिटांतच तब्बल 67 कोटी रुपयांचा नफा झाला.

advertisement

रेखा झुनझुनवाला यांची फेडरल बँकेत 2.42 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांच्या मालकीचे बँकेचे सुमारे 5.90 कोटी शेअर्स आहेत. सोमवार रोजी फेडरल बँकेचा शेअर 5.34 टक्क्यांनी वाढून 223 रुपयांच्या ऑल-टाईम हाय स्तरावर पोहोचला. मागील क्लोजिंग प्राइस 212.40 रुपयांच्या तुलनेत ही मोठी वाढ होती. या वाढीमुळे त्यांच्या गुंतवणुकीच्या मूल्यात सुमारे 67 कोटी रुपयांची वाढ झाली. या उछालानंतर बँकेचे मार्केट कॅप 53,976 कोटी रुपयांवर पोहोचले.

advertisement

Federal Bank Share Price

फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये आलेली ही तेजी बँकेच्या दुसऱ्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालांमुळे दिसून आली. अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आणि बाजार उघडताच खरेदीची लाट उसळली. बीएसई (BSE) वर सुमारे 5.22 लाख शेअर्सची खरेदी-विक्री झाली ज्याची एकूण किंमत 11.51 कोटी रुपये इतकी होती.

advertisement

टेक्निकल विश्लेषणानुसार फेडरल बँकेचा शेअर सध्या मजबूत स्थितीत आहे. या शेअरचा RSI (Relative Strength Index) 68.2 आहे. ज्यावरून हे स्पष्ट होते की शेअर ना ओव्हरबॉट आहे ना ओव्हरसोल्ड. तो सध्या आपल्या 5-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा वर आहे.

advertisement

मार्च 2025 मध्ये हा शेअर 172.95 रुपयांपर्यंत खाली आला होता, पण आता त्यात जवळपास 30 टक्क्यांची तेजी आली आहे. ज्यांनी त्या काळात खरेदी केली होती, त्यांना आता उत्कृष्ट परतावा मिळाला आहे.

ब्रोकरेज हाऊसेसचा अंदाज

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी फेडरल बँकेवरBuy’ रेटिंग दिली आहे आणि 250 रुपयांचे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे. तर नुवामा ब्रोकरेज (Nuvama Brokerage) यांनी 245 रुपयांचे टारगेट दिले आहे. दोन्ही संस्थांनी बँकेची मजबूत कर्ज वाढ (loan growth), सुधारलेली NIM (Net Interest Margin) आणि स्थिर अ‍ॅसेट क्वालिटी हे सकारात्मक घटक असल्याचे नमूद केले आहे.

मराठी बातम्या/मनी/
रेखा झुनझुनवाला यांनी मोठा दाव कुठे लावला? फक्त काही मिनिटांत 67 कोटींचा नफा; मार्केटमध्ये कुजबुज सुरू, तज्ज्ञही गोंधळले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल