पॅनकार्ड धारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. नवीन पॅनकार्ड फ्रेंडली असेल. त्यावर एक QR कोड दिला जाईल. हा कोड स्कॅन केल्यानंतर तुमची माहिती सगळी मिळणार आहे. हा डेटा अत्यंत सुरक्षित असेल. त्यामुळे पॅनधारकांना कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही.
युजर्सना पॅनकार्डमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काही दिवस हेल्प डेस्क आणि कॉल सेंटरची सुविधा दिली जाणार आहे. आयकर विभागाने सांगितले की तुमच्याकडे जर व्हेरिफाय केलेलं पॅनकार्ड असेल तर तुम्हाला पुन्हा पॅनकार्ड काढण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे असलेलं पॅनकार्ड अपडेट होईल. तुम्ही ते आधारकार्डला लिंक करणं गरजेचं आहे.
advertisement
नव्या पॅनकार्डमध्ये आधीसारखं नाव, पत्ता बदलता येणार आहे. तुम्ही फोटो देखील बदलू शकता, मात्र त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. QR कोडमुळे अधिक पॅनकार्ड सुरक्षित होणार आहे. फ्रॉडला आळा घालण्यासाठी ते गरजेचं आहे. तुमचा डेटा अधिक सुरक्षित राहणार आहे.
पॅन 2.0 मधील QR कोड मुळे नकली पॅनकार्ड बनवण्याचे प्रमाण कमी होईल. पॅनकार्ड व्हेरिफिकेशन करणं सोपं जाईल. QR कोड स्कॅन करून माहितीची थेट पडताळणी करता येते. तुम्ही मोबाईल ॲप किंवा पोर्टलद्वारे ती स्कॅन करून लगेच माहिती मिळवू शकता. क्यूआर कोडमध्ये नाव, जन्मतारीख, पॅन क्रमांक आणि इतर तपशील एनक्रिप्टेड स्वरूपात असतील, ज्यामुळे ते अधिक सुरक्षित होईल.
