पॅनकार्डचं महत्त्व
तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या ओळखीचं आणि आर्थिक व्यवहारांसाठी अत्यावश्यक असलेलं डॉक्युमेंट आहे. त्यामुळे त्यावर नावात जर थोडीशीही चूक असेल किंवा लग्नानंतर सरनेम बदलला असेल, तर लगेच सुधारणा करणे गरजेचे आहे. अन्यथा बँकिंग, इनकम टॅक्स किंवा सरकारी कामकाजाच्या वेळी तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत सरकारकडून नाव बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
advertisement
श्रीमंत व्हायचंय? मग सोनं नको... चांदी खरेदी करा! अमेरिकन एक्सपर्टचा मोठा सल्ला
नाव आडनाव कधी बदलायची गरज?
पॅन कार्डावर नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असल्यास नाव बदलण्याची गरज लागू शकते. कोर्ट किंवा गॅझेटद्वारे नाव बदलल्यानंतर अधिकृत नावात बदल करण्याची गरज असते. विशेषतः महिलांनी विवाहानंतर आडनाव बदलल्यास नाव आणि आडनाव बदलावं लागू शकतं.
पॅन कार्ड नाव बदलण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
NSDL वेबसाईटवर लॉगिन करा: https://www.tin-nsdl.com या अधिकृत साइटवर जा.
फॉर्म निवडा: Correction/Change Request या ऑप्शनखाली पॅन अपडेट फॉर्म भरायचा आहे.
सर्व माहिती भरा: नाव, पत्ता, जुना पॅन नंबर यांसह आवश्यक डिटेल्स नीट भराव्यात.
डॉक्युमेंट सबमिट करा
स्पेलिंग दुरुस्ती: आधार कार्ड, पासपोर्ट यासारखी योग्य डॉक्युमेंट्स अपलोड करा.
लग्नानंतर सरनेम बदल: मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असेल.
नाव बदल: गॅझेट नोटिफिकेशन किंवा कोर्ट ऑर्डर द्या.
फी भरा: भारतीय पत्त्यासाठी साधारण 105 रुपये तर परदेशी पत्ता असल्यास 1,020 रुपये फी लागू शकते.
फॉर्म सबमिट करा: सर्व तपशील भरून फॉर्म अंतिम सबमिट करा.
Fastag Update: FASTag मध्ये मोठा बदल! टोलसोबत पार्किंग, EV चार्जिंग आणि विम्यासाठीही लवकरच नवा नियम
पॅन कार्ड किती दिवसात अपडेट होईल?
तुम्ही ही सगळी माहिती जमा केल्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर 7-10 दिवसांत ई-पॅन मेलद्वारे उपलब्ध होईल. ई पॅन त्याला म्हणता येईल. हे ई पॅन तुम्ही सगळीकडे जोडू शकणार आहात. पोस्टाद्वारे साधारण 15-45 दिवसांत नवीन फिजिकल पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर मिळेल. जर तुमच्या पत्त्यावर पॅनकार्ड आलं नाही तर तुम्ही या साइटवर जाऊन तिथे तुमची क्वेरी टाकू शकता.
भारतात रेल्वे भाडं वाढलं, पण कोणत्या देशात रेल्वेचं तिकीट सर्वात स्वस्त?
NSDL वेबसाइटवर Acknowledgement Number टाकून तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस सहज तपासू शकता. आजकाल बँकिंग, शेअर्स, म्युच्युअल फंड, सरकारी योजनांसाठी पॅन कार्ड हे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे नावात जर कोणतीही गडबड असेल तर तातडीने सुधारणा करा. उशीर केल्यास आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात.
