पार्वताबाई गेले 20 वर्षे विरारहून दररोज दादरला येतात. वय झालं म्हणून काय झालं, घर चालवायचं असेल तर काम तर करावंच लागतं, असं त्या हसत म्हणतात. त्यांच्या स्टॉलवर लहान मुलांचे रंगीबेरंगी फ्रॉक आकर्षकपणे मांडलेले दिसतात. हे सर्व फ्रॉक त्या स्वतः बनवून घेतात. कपडा स्वतः निवडतात, शिवतात आणि विकतात.
Sarees Shopping : अस्सल कॉटन साड्या, खरेदी करा फक्त 350 रुपयांत, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
advertisement
दादरच्या परिसरातील लोक त्यांना फ्रॉकवाली आजी म्हणून ओळखतात. त्यांच्या शेजारील दुकानातील व्यापारी सांगतात, मी गेली वीस वर्षं त्यांना रोज पाहतोय. पाऊस असो वा ऊन, त्या न थकता आपल्या स्टॉलवर येतात. त्या खरंच प्रेरणादायी आहेत.
पार्वताबाईंच्या फ्रॉकची खासियत म्हणजे चांगली गुणवत्ता आणि परवडणारी किंमत. ज्या प्रकारचे फ्रॉक मोठ्या दुकानांत 700 ते 1000 रुपयांना मिळतात, तेच फ्रॉक पार्वताबाईंकडे फक्त 250 रुपयांत उपलब्ध असतात. त्यामुळे स्थानिक ग्राहक आणि दादरला येणारे अनेकजण खास त्यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी थांबतात.
माझ्या फ्रॉकची क्वालिटी लोकांना आवडते तेच माझं समाधान, असं त्या नम्रतेने सांगतात. वयाच्या सत्तरीनंतरही त्यांची जिद्द, मेहनत आणि आत्मनिर्भरतेची भावना अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
दादरच्या गर्दीतही पार्वताबाईंचं हे साधं पण खंबीर अस्तित्व आपल्याला शिकवून जातं की मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही.खंबीर अस्तित्व आपल्याला शिकवून जातं की मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही.