Sarees Shopping : अस्सल कॉटन साड्या, खरेदी करा फक्त 350 रुपयांत, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
उच्च प्रतीच्या प्योर नॅचरल कॉटन साड्या आता केवळ 350 रुपये या अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मुंबई : पारंपरिक तसेच आधुनिक साड्यांच्या शौकिन महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर येथून थेट आणलेल्या उच्च प्रतीच्या अस्सल कॉटन साड्या आता केवळ 350 रुपये या अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विलेपार्लेतील जुन्या आणि नामांकित साडी स्टॉलवर या साड्यांची खरेदी करता येईल.
साधारणपणे या प्रकारच्या साड्या बाजारात 1000 ते 1200 रुपयांपर्यंत मिळतात. मात्र या स्टॉलवर ग्राहकांना त्याच दर्जाच्या आणि आकर्षक डिझाईन्समधील साड्या अविश्वसनीय अशा कमी किमतीत मिळत आहेत. साड्यांमध्ये असंख्य व्हरायटीज, आकर्षक रंगसंगती आणि नवीन ट्रेंडनुसार डिझाईन्स उपलब्ध आहेत. दैनंदिन वापरापासून ते खास प्रसंगांसाठी घालाव्यात अशा प्रत्येक प्रकारच्या साड्या येथे मिळतात.
advertisement
फक्त इतकेच नव्हे, तर येथे बांधणी साड्या, नऊवारी साड्या आणि पारंपरिक महाराष्ट्रीय डिझाईन्समधील खास कलेक्शनदेखील ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पारंपरिक पोशाखांचा आवड असणाऱ्या महिलांसाठी हा स्टॉल म्हणजे एक आदर्श ठिकाण ठरणार आहे.
ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक ऑफर म्हणजे जर कोणी एकापेक्षा जास्त साड्या खरेदी केल्या, तर त्यांना 10 टक्के विशेष सवलत दिली जाते. त्यामुळे आपल्या मैत्रिणी, नातेवाईक किंवा आईसाठी गिफ्ट म्हणूनही साड्या घेण्याची ही योग्य वेळ आहे.
advertisement
हा साडी स्टॉल विलेपार्ले (पूर्व) येथील राममंदिरच्या शेजारी, विजय स्टोअरच्या समोर लागतो. सोयीस्कर ठिकाण आणि अनुभवी विक्रेते यामुळे येथे खरेदीचा अनुभव अधिक आनंददायक ठरतो. पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम अनुभवायचा असल्यास या साड्यांचा संग्रह नक्की पाहा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sarees Shopping : अस्सल कॉटन साड्या, खरेदी करा फक्त 350 रुपयांत, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

