Success Story : नातवाने पूर्ण केलं आजी-आजोबांचं स्वप्न, पिंपरी-चिंचवडमधील यश बनला CA
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पिंपरी-चिंचवड येथील यश शहा याने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
पुणे : अतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या सीए (Chartered Accountant) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पिंपरी-चिंचवड येथील यश शहा याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. बारा-बारा तास अभ्यास करून त्याने चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं स्वप्न साकार केलं. त्याच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
यश शहा यांनी सांगितलं की, त्यांनी बी.कॉमचे शिक्षण प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्समधून, तर एम.कॉम पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं. त्याचबरोबर त्यांनी CA ची तयारीही सुरू ठेवली. या प्रवासात, CA Intermediate स्तरावर, त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, प्रत्येक अपयशातून शिकत त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर CA Final मध्ये दोन्ही ग्रुप एकाच प्रयत्नात उत्तीर्ण झाला.
advertisement
नातवाने पूर्ण केलं आजी-आजोबांचं स्वप्न
view commentsCA च्या प्रवासादरम्यान यश यांनी आपली आर्टिकलशिप पूर्ण केली, ज्यातून त्यांना टॅक्सेशन, ऑडिट आणि फायनान्स या क्षेत्रांतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला. स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी त्यांनी MS-CIT, AI for Finance, आणि Business Market Simulation यांसारखे अतिरिक्त कोर्सेस पूर्ण केले. या कोर्सेसमुळे त्यांची आर्थिक विश्लेषण, तांत्रिक समज आणि व्यावसायिक निर्णयक्षमता अधिक मजबूत झाली. आजी आणि आजोबांमुळेच मी CA बनण्याचं स्वप्न पाहिलं, आणि आज त्यांच्या आशीर्वादामुळेच ते स्वप्न पूर्ण झालं, असं यश शहा यांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 07, 2025 3:24 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : नातवाने पूर्ण केलं आजी-आजोबांचं स्वप्न, पिंपरी-चिंचवडमधील यश बनला CA

