आता यूझर्सना वेगवेगळ्या बँक खात्यांची बॅलेन्स जोडण्याची आवश्यकता नाही. कारण पेटीएम अॅप त्यांना रिअल-टाइममध्ये एकात्मिक स्वरूपात एकूण बॅलेन्स दाखवत आहे.
आता मॅन्युअली जोडण्याचा त्रास संपला आहे
आतापर्यंत यूझर्सना वेगवेगळ्या खात्यांचे बॅलेन्स तपासावी लागत होती आणि ती स्वतः जोडावी लागत होती. परंतु पेटीएमच्या या नवीन फीचर अंतर्गत, एकदा UPI पिन एंटर केल्यानंतर, सर्व लिंक केलेल्या बँक खात्यांची शिल्लक ऑटोमॅटिक जोडली जाते आणि एकाच स्क्रीनवर दाखवली जाते. यामुळे आर्थिक नियोजन, बजेटिंग, खर्चावर नियंत्रण आणि बचत खूप सोपे होते.
advertisement
तुमच्या नावावर दुसऱ्या कोणीतरी सिम तर नाही घेतलंय? पहा तुमच्या नावावर किती सिम कार्ड
आर्थिक ट्रॅकिंग आता पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट आणि सोपे झाले आहे
पेटीएमने नेहमीच आपल्या यूझर्ससाठी फीचर्स सोपी आणि स्मार्ट बनवली आहेत. या नवीन फीचरविषयी कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आर्थिक व्यवस्थापन सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी आम्ही सतत नवनवीन शोध घेत आहोत. आता यूझर्स पेटीएम अॅपवर त्यांच्या सर्व बँक खात्यांचे एकूण आणि पर्सनल बॅलेन्स एकाचवेळी पाहू शकतात, जे त्यांना चांगले आणि अचूक आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल."
हे फीचर कसे वापरावे?
- पेटीएम अॅप उघडा आणि "बॅलन्स आणि हिस्ट्री" विभागात जा.
- तुम्ही अद्याप तुमचे बँक अकाउंट्स UPI शी लिंक केले नसेल, तर प्रथम त्यांना लिंक करा.
- लिंक केल्यानंतर, प्रत्येक अकाउंटचं बॅलेन्स जाणून घेण्यासाठी UPI पिन टाका.
- तुम्ही एका अकाउंटचं बॅलेन्स शिल्लक तपासताच, अॅप स्क्रीनच्या वरच्या बाजूला सर्व लिंक केलेल्या खात्यांची एकूण शिल्लक ऑटोमॅटिक दिसेल.
सर्वात जास्त फायदा कोणाला होईल?
- ज्यांच्याकडे सॅलरी, सेव्हिंग्स आणि खर्चासाठी स्वतंत्र बँक अकाउंट्स आहेत
- जे वारंवार बॅलेन्स चेक करतात
- ज्यांना त्यांचे खर्च आणि बचतीचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे
- ज्यांना ट्रॅकिंग अॅप्सचा त्रास टाळायचा आहे