HDFC Card Rule Change: HDFC ग्राहकांचं बजेट बिघडणार, 1 जुलैपासून नियम बदलणार, आकारले जाणार नवे चार्जेस

Last Updated:

HDFC Card Rule Change: कोणत्या सुविधांवर तुम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत याची संपूर्ण यादी इथे चेक करा, नाहीतर तुमचं बजेट बिघडलच म्हणून समजा.

News18
News18
HDFC bank Rule change From 1 July- HDFC बँकेत तुमचं खातं असेल किंवा तुमच्याकडे त्यांचं क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 1 जुलैपासून ICICI बँकेप्रमाणे या बँकेचे नियमही बदलणार आहेत. बँकेच्या कोट्यवधी क्रेडिट कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जुलै २०२५ पासून कार्ड वापराच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार असून, काही व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कार्ड वापरण्याआधी खर्चाचे योग्य नियोजन करणं अत्यावश्यक आहे नाहीतर बजेट बिघडलंच म्हणून समजायचं.
नव्या नियमांनुसार, जर तुम्ही Dream11, MPL, Rummy Culture, Junglee Games यांसारख्या स्किल-बेस्ड गेमिंग प्लॅटफॉर्मवर महिन्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च केला, तर 1 टक्के शुल्क आकारले जाईल. याची कमाल मर्यादा 4,999 रुपये इतकी असेल आणि या व्यवहारांवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत. याआधी रिवर्ड पॉईंट्स मिळत होते ती सुविधा बंद करण्यात आली आहे.
advertisement
Paytm, Mobikwik, Ola Money, Freecharge यांसारख्या थर्ड पार्टी वॉलेटमध्ये महिन्याला 10,000 रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केल्यासही एक टक्के शुल्क आकारले जाईल. यामध्येही कमाल शुल्काची मर्यादा तीच राहील. युटिलिटी बिल्सच्या बाबतीत, जर ग्राहक कार्डधारक असाल आणि महिन्याला 50,000 रुपयांहून अधिक रक्कम भरली, किंवा बिझनेस कार्डवर 75,000 रुपयांचा टप्पा ओलांडला, तर त्यावरही एक टक्के शुल्क आकारले जाईल. विमा प्रीमियम भरताना मात्र कोणतेही शुल्क लागू होणार नाही.
advertisement
रेंट भरणे, इंधन खरेदी आणि शिक्षण शुल्क यावरही नियम बदलले आहेत. थर्ड पार्टी अ‍ॅप्समधून शिक्षण शुल्क भरल्यास १% शुल्क लागेल, मात्र थेट कॉलेज किंवा शाळेच्या वेबसाइटवरून पेमेंट केल्यास सूट मिळेल. इंधन व्यवहारांवरही आता रकमेवर आधारित शुल्क लागू होईल.याशिवाय, काही कार्ड्सवर विमा पेमेंटसाठी रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार असले तरी त्यावर कॅप असेल. केवळ Marriott Bonvoy कार्डवर याची मर्यादा नसेल. ग्राहकांनी या बदलांचा विचार करून जुलैपूर्वीच खर्चाचे नियोजन करावे, अन्यथा अनावश्यक शुल्क आणि रिवॉर्ड्स गमवण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/मनी/
HDFC Card Rule Change: HDFC ग्राहकांचं बजेट बिघडणार, 1 जुलैपासून नियम बदलणार, आकारले जाणार नवे चार्जेस
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement