advertisement

चंद्रपूर पालिकेत हायहोल्टेज ड्रामा, आता ठाकरे गटाची लागणार लॉटरी? भाजपकडून मिळणार ग्रीन सिग्नल!

Last Updated:

चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांच्या सोबत चर्चा झाली.

News18
News18
हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर : देव देतं आणि कर्म नेतं, अशीच अवस्था आता चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे सत्ता गमावण्याची नामुष्की येण्याची चिन्ह आहे. कारण, भाजपने आता या वादात एंट्री केली आहे. ठाकरे गट, वंचित आणि अपक्ष नगरसेवकांनी मुंबई गाठली आहे. या १० नगरसेवक आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेणार आहे. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाला महापौर देण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
advertisement
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांच्या सोबत चर्चा झाली. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द महत्त्वाचा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची किशोर जोरगेवार आणि बंटी भांगडीया यांना सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करण्याचे निर्देश दिले आहे.
शिवसेना ठाकरे गटाला महापौरपद द्यायचे की नाही याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय कुठलाच निर्णय होणार नाही. शिवसेना ठाकरे गटाला महापौरपद देण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांचं प्रतिकूल मत आहे, त्यामुळे मुनगंटीवार यांच्या सोबत चर्चा झाल्यावरच याबाबत अखेरचा निर्णय होणार आहे. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर उद्या मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना ठाकरे गटाेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांना भेटण्याची शक्यता आहे.
advertisement
भाजपकडे कसा आहे फॉर्म्युला?
चंद्रपूर पालिकेमध्ये भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. भाजपकडे  २३ जागा आहे. तर ठाकरे गट किंगमेकरच्या भूमिकेत आहे. पालिकेत बहुमतासाठी ३४ जागांची गरज आहे. भाजप, ठाकरे गट ६, शिंदे गट -१,  बहुजन आघाडी आणि २ अपक्ष नगरसेवक असे मिळून ३४ जागेचा आकडा गाठत आहे. त्यामुळे  भाजपचे वरिष्ठ नेते मात्र, ठाकरे गटाला सोबत घेतील की नाही, हे पाहण्याचं ठरणार आहे.
advertisement
काँग्रेसमध्ये अजूनही धुसफुस सुरूच
तर दुसरीकडे, चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये गोंधळ सुरूच आहे.  खासदार धानोरकर गटाचे 12 नगरसेवक वेगवेगळ्या अज्ञातस्थळी रवाना झाले आहे. तर आमदार विजय वडेट्टीवार गटाचे सुमारे 15 नगरसेवकही अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहे. तर भाजपच्या 23 नगरसेवकांपैकी 18 ते 20 नगरसेवक पर्यटनासाठी बाहेर आहे. काँग्रेसमध्ये अजूनही सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून वाद मिटला असल्याचं सांगितलं जात आहे, पण, अंतर्गत वाद अजूनही शमलेला नाही.
advertisement
चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल - एकूण जागा ६६
काँग्रेस -२७
भाजप- २३
ठाकरे गट - ०६
जनविकास सेना - शेकाप -०३
वंचित बहुजन आघाडी - ०२
शिंदे गट शिवसेना- ०१
एमआयएम- ०१
बहुजन समाज पार्ट- ०१
अपक्ष - ०२
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चंद्रपूर पालिकेत हायहोल्टेज ड्रामा, आता ठाकरे गटाची लागणार लॉटरी? भाजपकडून मिळणार ग्रीन सिग्नल!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement