घर खरेदी, दुरुस्ती आणि शिक्षण/विवाहासाठी किती पैसे काढणे आवश्यक आहे?
तुम्हाला घर खरेदी करायचे असेल किंवा दुरुस्ती करायची असेल, तर तुम्ही तुमच्या अकाउंटमधील बॅलेन्स रकमेच्या 90% पर्यंत काढू शकता. याचा अर्थ असा की तुमच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये असतील, तर 90,000 पर्यंत काढण्याची परवानगी आहे. कुटुंबात आजारी पडल्यास, ईपीएफओ तुम्हाला 100% रक्कम काढण्याची परवानगी देतो. मुलांच्या किंवा भावंडांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी 75% (कंट्रीब्यूशन + व्याज) काढता येते. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पीएफवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम मोठा दिलासा आहे.
advertisement
31 डिसेंबरआधी करुन घ्या 5 महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
नोकरी आणि बेरोजगारी दरम्यान तुम्ही किती पैसे काढू शकता?
तुम्ही तुमच्या सध्याच्या नोकरीत 12 महिने पूर्ण केले असतील, तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील 75% पर्यंत काढू शकता. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यात 1 लाख रुपये असतील, तर तुम्ही 75,000 रुपयांपर्यंत काढू शकता. नोकरी सोडल्यास किंवा गमावल्यास, दोन महिन्यांच्या बेरोजगारीनंतर 100% रक्कम काढण्याची परवानगी आहे. नवीन नियमांनुसार, काही प्रकरणांमध्ये 12 महिन्यांनंतर पूर्ण पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर पूर्वी 5 ते 7 वर्षांच्या सेवेत असणे अनिवार्य होते.
रिटायरमेंटनंतर पूर्ण रक्कम कशी मिळते?
रिटायरमेंटनंतर, कर्मचारी त्यांचे संपूर्ण पीएफ बॅलेन्स कसे काढू शकतो. ईपीएफओच्या लेटेस्ट अपडेटनुसार, पैसे काढण्याची प्रोसेस अत्यंत सोपी करण्यात आली आहे. ज्यामुळे जास्त वाट न पाहता पूर्ण पीएफ काढता येतो. आरोग्य, गृहनिर्माण किंवा बेरोजगारीसारख्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी निधी उपलब्ध करून देणे, वेळेवर आर्थिक मदत सुनिश्चित करणे हे ईपीएफओचे उद्दिष्ट आहे. नियमांमधील या बदलांमुळे पैसे काढण्याची प्रोसेस पूर्वीपेक्षा सोपी आणि जलद होतेय.
