आता फायनेंस एक्सपर्ट्स मानतात की, वेगवेगळे अकाउंट ठेवण्याऐवजी एक किंवा दोन फॅमिली जॉइंट अकाउंट ठेवणं जास्त हुशारीचं पाऊल आहे. यामुळे पैशांवर लक्ष ठेवणं सोपं होतं. तसंच कुटुंबाच्या सदस्यांमध्येही पारदर्शकता असते.
फॅमिली जॉइंट अकाउंट म्हणजे काय?
फॅमिली जॉइंट अकाउंट असं बँक अकाउंट असतं, ज्यात कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य सामिल असतात. यात पती पत्नी, आई-वडील किंवा मुलांचाही समावेश असू शकतो. अशा प्रकारे अकाउंटमध्ये सर्व सदस्यांना पैसे जमा करणे आणि काढण्याची सुविधा मिळते. जी अकाउंटच्या ऑप्शनवर अवलंबून असते.
advertisement
कोणती बँक देते FD वर 8 टक्क्यांहून अधिक व्याज! 1 एप्रिलपासूनचे नवे व्याजदर संपूर्ण यादी
फॅमिली अकाउंटचे मोठे फायदे
फॅमिली जॉइंट अकाउंटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात अनेक बँक चांगले व्याजदर देतात. विशेषतः बॅलेन्स जास्त असतं तेव्हा. यामुळे तुमची सेव्हिंग वेगाने वाढू शकते. यासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांना माहिती असतं की, पैसा कुठे आणि कसा खर्च होतोय. यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो आणि चांगली प्लॅनिंग करता येऊ शकते.
आपात्कालिन परिस्थितीमध्येही हे अकाउंट आणखी कामी येतं. एखादा सदस्य उपलब्ध नसेल, तर दुसरा सदस्य सहज पैसे काढू शकतो आणि काम थांबत नाही. यासोबतच वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे लावल्याने एसएमएस फीस, एटीएम चार्ज आणि मिनिमम बॅलेन्स पेनल्टीपासूनही बचाव करता येतो. यासोबतच वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये 2.5 ते 3.5 टक्के व्याज मिळतं. तर फॅमिली अकाउंटमध्ये अनेक बँका 4 ते 7 टक्के व्याजदर देतात.
SBI मध्ये 4 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल 1,40,071 रुपयांचं फिक्स व्याज! ही स्किम कोणती?
कोणत्या बँकांमध्ये मिळतात चांगले फॅमिली अकाउंट
भारतात अनेक बँक फॅमिली किंवा जॉइंट अकाउंटची सुविधा देतात. यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे. या बँकांमध्ये काही स्किम्स अशा आहेत, ज्यात जास्त बॅलेन्सवर चांगलं व्याज आणि अतिरिक्त सविधाही मिळतात.
काय रणनीती वापरावी
तुमचं कुटुंब लहान असेल, तर एक मुख्य फॅमिली अकाउंट आणि एक वेगळं एमर्जेंसी किंवा इनव्हेस्टमेंट अकाउंट ठेवणं पुरेसं असतं. यामुळे तुमचं फायनेंसही व्यवस्थित राहतं आणिगरज पडल्यावर लगेच पैसा उपलब्ध राहतो. खुप जास्त अकाउंट ठेवल्याने ट्रॅकिंग करणं कठीण होतं. यासोबतच अनेकदा अकाउंट फ्रिज किंवा केवायसी सारख्या समस्या समोर येऊ शकतात.
