TRENDING:

सॅलरी स्लिपशिवाय पर्सनल लोन हवंय? हो 5 डॉक्यूमेंट तुमचं काम करतील सोपं 

Last Updated:

Personal Loan Tips:  तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसेल पण तरीही पर्सनल लोनची आवश्यकता असेल तर काळजी करू नका. अनेक बँका आणि एनबीएफसी आता अनौपचारिक उत्पन्न असलेल्या किंवा फ्रीलांसर/स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना कर्ज देत आहेत.

advertisement
Personal Loan Tips: तुम्हाला सॅलरी स्लिपशिवाय पर्सनल लोन हवे असेल तर काळजी करू नका. बँका आणि एनबीएफसी आता केवळ सॅलरी स्लिपवर अवलंबून नाहीत. तुमच्याकडे काही मजबूत पर्यायी कागदपत्रे असतील तर तुम्ही सहजपणे कर्ज मिळवू शकता. फक्त तुमच्या उत्पन्नाचा वैध पुरावा द्या आणि तुमचा क्रेडिट प्रोफाइल सुधारा. तुम्ही फ्रीलांसर असाल, सेल्फ-एम्प्लॉयड असाल किंवा अनियमित उत्पन्न असाल, कर्ज मंजूरी मिळवणे पूर्वीइतके कठीण नाही.
पर्सनल लोन
पर्सनल लोन
advertisement

सॅलरी स्लिपशिवाय कर्ज कसे मिळवायचे?

आज बहुतेक लेंडर्स ऑप्शनल डॉक्यूमेंट स्वीकारतात. यामध्ये समाविष्ट आहे:

  • गेल्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • दोन वर्षांचे ITR
  • फॉर्म 16 किंवा एम्प्लॉयमेंट लेटर (जर असेल तर)
  • GST रिटर्न (फ्रीलांसर/व्यवसाय मालकांसाठी)
  • भाडे, कमिशन किंवा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे डॉक्यूमेंट

फक्त 2 मिनिटांत घरबसल्या कॅन्सल होईल फ्लाइट तिकीट! मिळेल पूर्ण रिफंड, पाहा कसं

advertisement

हे डॉक्यूमेंट्सने लेंडर तुमचा कॅश फ्लो आणि रीपेमेंट क्षमता समजून घेण्यास मदत करतात. तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसल्या तरीही.

स्ट्राँग क्रेडिट प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे

सॅलरी स्लिप नसतात, तेव्हा लेंडर्स तुमच्या आर्थिक सवयींवर बारकाईने लक्ष ठेवतात. म्हणून:

  • 750 च्या वर क्रेडिट स्कोअर ठेवा.
  • कर्ज कमी ठेवा (कर्ज-ते-उत्पन्न गुणोत्तर कमी).
  • advertisement

  • तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता दाखवा.
  • सह-अर्जदार जोडा  तुमचा स्कोअर कमी असेल तर).
  • कोणत्याही EMI किंवा कार्ड पेमेंटमध्ये डिफॉल्ट करू नका.
  • स्वच्छ क्रेडिट हिस्ट्री कर्ज मंजूरी सुलभ करतो.

फक्त फोनवर टॅप करताच होईल Payment! आलंय भारी फीचर, पाहा कसं

लोन कुठे मिळेल?

अनेक खाजगी बँका, डिजिटल कर्जदाते आणि NBFC अशा ग्राहकांना पर्सनल लोन देतात जे सॅलरी स्लिप देऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी खालील गोष्टी या महत्त्वाच्या असतात...

advertisement

  • बँक स्टेटमेंटमध्ये रेग्युलर इनफ्लो
  • क्रेडिट स्कोअर
  • अलीकडील डिफॉल्ट हिस्ट्री नाही
  • कॅश फ्लोची स्थिरता
  • कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी व्याजदर, प्रोसेसिंग फीस आणि वेगवेगळ्या कर्ज पर्यायांच्या अटींची तुलना करणे सुनिश्चित करा.
  • पर्सनल लोनशी संबंधित 5 रिस्क
  • व्याजदर जास्त आहेत.
  • एकदा उशीरा EMI देखील तुमच्या क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचवू शकतो.
  • प्रीपेमेंट किंवा लेट फीस हे एक ओझे असू शकते.
  • advertisement

  • पैशांची सहज उपलब्धता काही लोकांना जास्त खर्च करण्यास प्रवृत्त करू शकते.
  • डिफॉल्टमुळे कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

मराठी बातम्या/मनी/
सॅलरी स्लिपशिवाय पर्सनल लोन हवंय? हो 5 डॉक्यूमेंट तुमचं काम करतील सोपं 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल