तुम्हाला माहिती आहे का की, भारतात अशा 3 बँका आहेत ज्या कधीही बुडणार नाहीत आणि सरकार त्यांना बुडू देणार नाही. भारतातील सर्वात सुरक्षित बँकांमध्ये एक सरकारी आणि 2 खाजगी बँकांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, देशातील ज्या बँकांना बुडण्याची अजिबात शक्यता नाही ती आहेत - स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक आणि HDFC बँक.
advertisement
Wifeच्या नावाने Post Officeमध्ये करा 1 लाखांची FD! पाहा 2 वर्षांनी किती मिळतील
भारतातील 3 सर्वात सुरक्षित बँकांचा समावेश D-SIB यादीत आहे
RBI ने 13 नोव्हेंबर 2024 रोजी डोमेस्टिक सिस्टिमली इम्पॉर्टंट बँक (D-SIB) यादी जाहीर केली. ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि ICICI बँक यांचा समावेश होता. या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्यांना 'टू बिग टू फेल' असे म्हटले जाते. D-SIB मध्ये समाविष्ट असलेल्या बँकांचे बुडणे देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकेल आणि सरकारलाही त्यांचे बुडणे सहन होणार नाही. म्हणून, सरकार आणि RBI त्यांच्या स्थिरतेची खात्री करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलतात. D-SIB यादीत समाविष्ट असलेल्या बँकांना त्यांच्या बकेटनुसार अधिक कॉमन इक्विटी टियर 1 राखावे लागते. हे असे भांडवल आहे ज्याद्वारे जोखीम सहजपणे व्यवस्थापित करता येते. D-SIB च्या यादीत समाविष्ट असलेल्या बँकांना ते मोठ्या प्रमाणात ठेवावे लागते.
ICICI-HDFC ते SBI पर्यंत, कोणत्या बँकेत किती मिनिमम बॅलेन्स आवश्यक? चेक करा लिस्ट
D-SIBsची संकल्पना पहिल्यांदा 2014 मध्ये सादर करण्यात आली
आरबीआयने 2014 मध्ये देशांतर्गत व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या बँकांची यादी तयार करण्याची संकल्पना पहिल्यांदा मांडली. याअंतर्गत 2015 मध्ये एसबीआय, त्यानंतर 2016 मध्ये आयसीआयसीआय बँकेचा आणि त्यानंतर 2017 मध्ये एचडीएफसी बँकेचा समावेश करण्यात आला.
