TRENDING:

Gold मार्केटमध्ये सुरू झाला ‘गोल्डन ट्विस्ट’; भावामुळे गुंतवणूकदार गोंधळले, कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल

Last Updated:

Gold Price: भारतामध्ये फिजिकल गोल्डची मागणी घटली असून किंमती कमी होण्याच्या अपेक्षेने खरेदीदार सावध आहेत. चीन आणि सिंगापूरमध्ये किंमती कमी झाल्या आहेत.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: भारतामध्ये या आठवड्यात भौतिक सोन्याची (Physical Gold) मागणी घटलेली दिसून आली आहे. कारण, अनेक खरेदीदारांनी किंमती आणखी खाली येतील या अपेक्षेने खरेदी थांबवली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार चीन आणि सिंगापूरमध्ये सोन्याच्या किंमती कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. मात्र भारतातील डीलर्सनी या आठवड्यातही अधिकृत देशांतर्गत किमतींवर 6% इंपोर्ट ड्युटी आणि 3% सेल्स टॅक्स धरून प्रति औंस 25 डॉलर्सपर्यंतचा प्रीमियम कायम ठेवला आहे, जो मागील आठवड्याच्या स्तरावरच आहे.

advertisement

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

देशांतर्गत बाजारात शुक्रवारी सोने सुमारे 1,22,700 प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले. गेल्या आठवड्यात त्याची किंमत 1,32,294 प्रति 10 ग्रॅम इतकी होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक पातळी (ऑल टाइम हाय) होती. दरम्यान स्पॉट गोल्डच्या किंमतीतही 10 आठवड्यांनंतर प्रथमच घसरण नोंदवली गेली आहे.

advertisement

खरेदीदार सावध

अहवालानुसार मुंबईतील एका ज्वेलरने सांगितले की- गेल्या आठवड्यात लोक कोणत्याही किंमतीत सोने खरेदी करत होते, परंतु या आठवड्यात किंमती कमी होण्याच्या शक्यतेमुळे ते सावध झाले आहेत. अनेकांना वाटत आहे की सोने अजून स्वस्त होईल, म्हणून त्यांनी खरेदी थांबवली आहे.

खरेदी मंदावली

advertisement

अलीकडेच देशभरात धनत्रयोदशी आणि दिवाळी हे प्रमुख सण साजरे झाले. या दोन्ही प्रसंगी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे तो काळ वर्षातील सर्वात गजबजलेला खरेदीचा हंगाम असतो. मात्र आता व्यापारी नवे इंपोर्ट ऑर्डर अतिशय सावधगिरीने आणि कमी प्रमाणात देत आहेत. कारण पुढील पंधरवड्यात इंपोर्ट बेस प्राइस कमी ठरवली जाण्याची शक्यता आहे.

advertisement

चीनमध्ये मात्र सोन्याची खरेदी-विक्री ग्लोबल बेंचमार्क स्पॉट प्राइसपेक्षा 20 डॉलर्सच्या डिस्काउंटपासून 8 डॉलर्सच्या प्रीमियमपर्यंतच्या मर्यादेत झाली आहे.

जागतिक बाजारातील स्थिती

MKS PAMP या प्रतिष्ठित संस्थेचे ग्रेटर चायनाचे रीजनल डायरेक्टर बर्नार्ड सिन यांच्या मते, सध्या सोन्याच्या किंमती $4,000 ते $4,300 प्रति औंस या दरम्यान मोठ्या प्रमाणात चढ-उतार करत आहेत. तरीदेखील, व्यापाऱ्यांकडून फिजिकल गोल्ड विक्रीचे संकेत अत्यंत मर्यादित आहेत. सध्याच्या अनिश्चित जागतिक आर्थिक वातावरणात आणि कमी होणाऱ्या वास्तविक व्याजदरांमुळे, गुंतवणूकदार अजूनही त्यांची सोन्याची होल्डिंग (मालकी) कायम ठेवत आहेत.

मराठी बातम्या/मनी/
Gold मार्केटमध्ये सुरू झाला ‘गोल्डन ट्विस्ट’; भावामुळे गुंतवणूकदार गोंधळले, कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल