TRENDING:

PNB कार्ड असणाऱ्यांनो लक्ष द्या! 1 एप्रिलपासून 'ही' फ्री सुविधा होणार बंद, नवे नियम लागू 

Last Updated:

Punjab National Bank Debit Card: पीएनबी RuPay प्लॅटिनम डेबिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2026 पासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहे. चला पाहूया हा नियम कोणता आहे.

advertisement
नवी दिल्ली : पंजाब नॅशन बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाचं अपडेट आलं आहे. पीएनबी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड धारकांना देण्यात येणारा फ्री देशांतर्गत एयरपोर्ट लाउंज अ‍ॅक्सेस आता संपत आहे. ही फ्री सुविधा 1 एप्रिल 2026 पासून बंद केली जाईल. पूर्वी, या कार्डद्वारे देशांतर्गत विमानतळावरील लाउंजमध्ये फ्री प्रवेश दिला जात असे. जिथे लोक आराम करू शकत होते, फ्री मॅगझीन्स वाचू शकत होते, अन्न आणि पेये घेऊ शकत होते, वाय-फाय वापरू शकत होते आणि त्यांच्या फ्लाइटची आरामात वाट पाहू शकत होते. हे विशेषतः लवकर पोहोचणाऱ्या किंवा कनेक्टिंग फ्लाइट असलेल्यांसाठी फायदेशीर होते.
पीएनबी डेबिट कार्ड अलर्ट
पीएनबी डेबिट कार्ड अलर्ट
advertisement

आता बँकेने नियम बदलले आहेत. 15 एप्रिल 2026 पासून, या लाउंजमध्ये प्रवेश पुन्हा उपलब्ध होईल, परंतु अटींसह. तुम्ही मागील तिमाहीत (तीन महिन्यांत) या कार्डवर किमान ₹5000 खर्च केले असतील तरच देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश दिला जाईल. याचा अर्थ ते फ्री नसेल, परंतु तुमच्या कार्ड वापरावर अवलंबून असेल.

या रकमेने खर्च कमी झाला तर मिळणार नाही लाउंज अ‍ॅक्सेस 

advertisement

बँकेने म्हटले आहे की, हा बदल कार्डच्या जास्त वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केला आहे. कोणताही नवीन चार्ज लागणार नाही. फक्त खर्चाची ही किमान अट पूर्ण करावी लागेल.

इथे फक्त 10 रुपयांत मिळते 24 कॅरेट शुद्ध सोनं, Gold खरेदी करण्याआधी जाणून घ्या हा भन्नाट मार्ग

तुम्ही गेल्या तीन महिन्यांत 5000 रुपयांपेक्षा कमी खर्च केला असेल, तर तुम्ही लाउंजमध्ये प्रवेश करू शकणार नाही. पीएनबीने त्यांच्या ग्राहकांना अधिकृतपणे सतर्क केले आहे. बँकेच्या वेबसाइट आणि स्टेटमेंटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तुम्ही नियमितपणे खरेदी, बिल पेमेंट किंवा ऑनलाइन व्यवहारांसाठी हे कार्ड वापरले तर 5000 रुपयांची आवश्यकता सहजपणे पूर्ण होईल आणि तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश मिळत राहील. तसंच, तुम्ही कार्ड कमी वेळा वापरला तर तुम्ही लाउंज अ‍ॅक्सेस करू शकणार नाही.

advertisement

हा बदल फक्त RuPay प्लॅटिनम डेबिट कार्डवर लागू आहे. इतर कार्ड्स जसं की, रुपे सिलेक्ट किंवा इतर व्हेरिएंट्सचे नियम वेगळे असू शकतात. यामुळे ग्राहकांना आपल्या कार्ड डिटेल्स चेक करुन घ्यायला हव्यात. ही सुविधा एयरपोर्टवरील प्रवास जास्त आरामदायक बनवत होती.

अनेक बँका आधीच असेच नियम लागू करतात जिथे लाउंज अॅक्सेस खर्चावर अवलंबून असतो. पीएनबी ग्राहक वारंवार प्रवास करत असतील, तर ते निकष पूर्ण करण्यासाठी कार्ड वापरून त्यांचे दैनंदिन छोटे खर्च वाढवू शकतात. जर नसेल, तर ते क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसारखे इतर पर्याय शोधू शकतात, जे अजूनही मोफत किंवा लवचिक लाउंज अॅक्सेस देतात. हा एक छोटासा बदल आहे, परंतु या फ्री फायद्यावर अवलंबून असलेल्यांसाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर उर्वरित डिटेल्स चेक करु शकता.

advertisement

सोन्या-चांदीची घसरण थांबली का? ज्यांनी महाग सोनं घेतलं त्यांचं काय? पाहा एक्सपर्ट काय सांगतात

पीएनबी व्यतिरिक्त 'या' बँकांनीही केले बदल 

1 फेब्रुवारी 2026 पासून ICICI बँकेने आपल्या काही क्रेडिट कार्ड्सवर BookMyShow च्या माध्यमातून मिळणाऱ्या फ्री मूव्ही सुविधा बंद केल्या आहेत. खरंत बँक अनेक कार्ड्स व्हेरिएंट्सवर ट्रान्सपोर्ट आणि इन्शुरन्स खर्चावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स जारी ठेवले आणि ते आणखी चांगले बनवेल. त्याच दिवशी, HDFC बँकेने त्यांच्या क्रेडिट कार्ड प्रोग्राममध्येही बदल केले. बँकेने त्यांच्या Infinia मेटल क्रेडिट कार्डसाठी रिवॉर्ड पॉइंट रिडेम्पशन नियम बदलले, ज्यामुळे रिडीम केलेल्या पॉइंट्सची संख्या दरमहा पाच पर्यंत मर्यादित झाली.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
PNB कार्ड असणाऱ्यांनो लक्ष द्या! 1 एप्रिलपासून 'ही' फ्री सुविधा होणार बंद, नवे नियम लागू 
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल