2023च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती. ही योजना फक्त मार्च 2025पर्यंत उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अकाउंट कसं चालू करायचं ते जाणून घेऊ या.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेसाठी अकाउंट कसं उघडायचं?
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेसाठी अकाउंट उघडण्यासाठी मुलीचं वय किमान 18 वर्षं असावं लागतं. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाचं अकाउंट उघडता येतं; पण ते अकाउंट मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक चालू करू शकतात. या योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिसमधून गुंतवणूक करू शकता. अकाउंट चालू करण्यासाठी महिलांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात.
advertisement
मुदतीआधी काढता येते रक्कम
या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड दोन वर्षांचा असतो. यात गुंतवणूक केल्यावर दोन वर्षं पूर्ण व्हायच्या आधी थोडी रक्कम काढता येते. तुम्ही गुंतवलेल्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम तुम्ही एका वर्षानंतर काढू शकता. तुम्ही तुमच्या महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत दोन लाख रुपये गुंतवले असतील, तर त्यापैकी 80 हजार रुपये एक वर्षानंतर काढता येतील.
या योजनेत गुंतवणूक केल्यावर किती परतावा मिळतो
महिलांनी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत 50 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यांना या गुंतवणुकीवर दोन वर्षांच्या कालावधीत व्याज म्हणून 8011 रुपये मिळतात. दोन वर्षांनी तुम्हाला 58,011 रुपयांचा परतावा मिळेल. तसंच तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 1,16,022 रुपये मिळतील. 16 हजार 22 रुपये हे त्यावरचं व्याज असेल.
