टीपी मॅगी पॉईंट मध्ये मॅगी, पास्ता, कोल्ड कॉफी अशा आकर्षक पदार्थांची चव ग्राहकांना मिळते. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ प्रणाली स्वतः बनवते आणि तन्मय ग्राहकांना स्वतः सर्व्ह करतो. त्यांच्या दोघांची मेहनत आणि ग्राहकांशी असलेला आपुलकीचा संवाद हेच त्यांच्या यशाचे गमक ठरले आहे. आज ते या व्यवसायातून महिन्याला नोकरी करून जितके मिळत होते त्याच्या डबल ते कमवत आहेत. महिन्याला प्रत्येकी 60 हजार कमाई ते करतात.
advertisement
तन्मय सांगतो, आम्ही दोघेही मिडल क्लास मराठी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे व्यवसाय सुरू करताना अनेक नकार आणि अडथळे आले, पण आम्ही हार मानली नाही. प्रयत्न करत राहिलो आणि आज लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रणाली आणि तन्मय यांचा ठाम विश्वास आहे की व्यवसायाचा फक्त विचार करून काही होणार नाही तर कृती करणे गरजेचे आहे. त्यांनी स्वतःसाठी ‘365 डे चॅलेंज’ घेतले आहे, ज्याद्वारे ते दररोज इंस्टाग्रामवर आपल्या प्रवासाची झलक लोकांसमोर मांडतात. या उपक्रमामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे की सातत्य आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की मिळते.
अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम पेजने 1000 फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून हे त्यांच्यासाठी अभिमानास्पद क्षण ठरले आहे. प्रणाली आणि तन्मय सांगतात, सातत्य आणि मेहनत हे यशाचे दोन आधारस्तंभ आहेत. स्वप्नं बघा, पण ती पूर्ण करण्यासाठी कृती करा, यश तुमच्याही पावलांशी जोडले जाईल.
टीपी मॅगी पॉईंटची ही यशोगाथा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, सातत्य आणि मेहनत या तीन गोष्टी असतील तर कोणतेही स्वप्न अपुरे राहत नाही.