Success Story : नोकरी सोडून फायदा झाला! 22 वर्षांच्या तरुणाने उभारला 'मिस्टर खिचडीवाला' ब्रँड, एकाच वर्षात 4 शाखा!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
या तरुणाने उच्च शिक्षण घेऊन देखील स्वतःचा मिस्टर खिचडीवाला या नावाने उद्योग सुरू केला आहे. लहानपणापासून पाहिलेले व्यवसायाचे स्वप्न त्याने आज पूर्ण करून दाखवले आहे.
नाशिक : नाशिकमधील अवघ्या 22 वर्षांच्या ओंकार राणे या तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर कमी वेळात एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या तरुणाने उच्च शिक्षण घेऊन देखील स्वतःचा मिस्टर खिचडीवाला या नावाने उद्योग सुरू केला आहे. लहानपणापासून पाहिलेले व्यवसायाचे स्वप्न त्याने आज पूर्ण करून दाखवले आहे. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास आज आपण लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
स्वप्न पाहिले, ते पूर्ण केले
बी.कॉम (B.Com) झालेले ओंकार यांचे लहानपणापासून स्वप्न होते की, आपला स्वतःचा काही व्यवसाय असावा. याकरिता ते नेहमी प्रयत्न करत असत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुभवासाठी या तरुणाने काही ठिकाणी नोकरी देखील केली, परंतु आवड मात्र स्वतःच्या व्यवसायाचीच होती.
advertisement
याच आवडीतून त्याने एक वर्षापूर्वी मिस्टर खिचडीवाला या नावाने खिचडी सेंटर सुरू केले. खानदेशी पद्धतीचा हा पदार्थ अगदी कमी भावात मिळत असल्याने नाशिककर त्याला चांगलाच प्रतिसाद देत आहेत.
एक वर्षात चार शाखा आणि 2-4 लाखांची उलाढाल
ओंकारने एक वर्षापूर्वी सुरू केलेल्या या मिस्टर खिचडीवाला व्यवसायाच्या आज तब्बल चार शाखा आहेत.
या यशाबद्दल बोलताना ओंकार सांगतात, नोकरी केली असती तर स्वप्न पूर्ण झाले नसते आणि पगाराची वाट बघावी लागली असती, परंतु आज स्वतःचा व्यवसाय करून मी माझे स्वप्नच नाही, तर घरच्यांचे स्वप्न देखील पूर्ण करत आहे.
advertisement
आज ओंकार अनेक लोकांना रोजगार देऊन त्यांचे घर चालवण्यास मदत करत आहेत आणि या व्यवसायाच्या माध्यमातून ते दर महिन्याला 2 ते 4 लाखांची उलाढाल करत आहेत.
हा 22 वर्षीय तरुण आजच्या युवा पिढीसाठी एक उत्तम आदर्श बनला आहे, ज्याने शिक्षणासोबतच उद्योजकतेचा मार्ग निवडला आणि कमी वेळात मोठे यश मिळवले.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 12, 2025 5:38 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी सोडून फायदा झाला! 22 वर्षांच्या तरुणाने उभारला 'मिस्टर खिचडीवाला' ब्रँड, एकाच वर्षात 4 शाखा!

