कारसारखे दरवाजे, पॉवर विंडो काचा अन् TV, Car लाजवले अशी रिक्षा, विदर्भाच्या राणीचा VIDEO

Last Updated:

एखाद्या लक्झरी कारपेक्षाही अधिक आरामदायी, आकर्षक आणि व्हीआयपी प्रवासाचा अनुभव देणारी ही ऑटोरिक्षा म्हणजेच विदर्भाची राणी. या रिक्षेत बसलात की डीजेचा आवाज, एसीचा गारवा, मनोरंजनाचा डोस आणि रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट असं सगळं एकाच वेळी अनुभवायला मिळतं. 

+
Amaravati

Amaravati News 

अमरावती : एखाद्या लक्झरी कारपेक्षाही अधिक आरामदायी, आकर्षक आणि व्हीआयपी प्रवासाचा अनुभव देणारी ही ऑटोरिक्षा म्हणजेच विदर्भाची राणी. या रिक्षेत बसलात की डीजेचा आवाज, एसीचा गारवा, मनोरंजनाचा डोस आणि रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट असं सगळं एकाच वेळी अनुभवायला मिळतं. अमरावतीतील बडनेरा परिसरात राहत असणारे कृष्णा मधुकर रोडगे हे या अनोख्या ऑटोरिक्षाचे मालक आणि चालक आहेत. दिवसा गॅस सिलिंडर वितरणाचं काम आणि रात्री ऑटो रिक्षा चालवणारे कृष्णा रोडगे आज संपूर्ण विदर्भात चर्चेत आहेत. कृष्णाच्या कल्पकतेने आणि मेहनतीने विदर्भाची राणी तयार झाली आहे.
कृष्णाच्या कल्पकतेने आणि मेहनतीने विदर्भाची राणी तयार झाल्यानंतर लोकल18 ने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते सांगतात, माझं स्वप्न होतं की, आपली ऑटोरिक्षा सर्वात वेगळी, सर्वात आकर्षक असावी. 2016 मध्ये मी सेकंडहँड रिक्षा घेतली आणि काही वर्षांनी नव्या रिक्षेत कल्पक बदल करण्याचं ठरवलं. मी आई-वडिलांना ही कल्पना सांगितली आणि त्यांनीही त्याला प्रोत्साहन दिलं. मी रिक्षा खरेदी केली आणि सजावट साठी तेलंगणा जाणार होतो. इतक्यात माझ्या मित्राने मला सुचवलं की, आपल्या इथेच आपण रिक्षा तयार करू अगदी तुला पाहिजे तशीच.
advertisement
त्यानंतर वेल्डिंगचे काम करणारे मोहम्मद मुजम्मील आणि नसरुल्ला खान यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने रिक्षेत एसी, पूर्णपणे बंद होणारी दारं आणि मजबूत बॉडी तयार करण्यात आली. त्यानंतर सीट कव्हरचा व्यवसाय करणाऱ्यांनी देखील रिक्षा सजविण्यासाठी मदत केली. रिक्षेच्या छतापासून ते सीट कव्हरपर्यंत, टीव्हीची बसवणीपासून ते लाईट डेकोरेशनपर्यंत सगळं नियोजनपूर्वक केलं गेलं.
advertisement
खर्च किती आला?
मी नवीन ऑटोरिक्षा 2 लाख 85 हजार रुपयांत खरेदी केली. त्यावर अतिरिक्त 2 लाख रुपये खर्च करून तिला राणी सारखं रूप दिलं. आता ही माझी रिक्षा दिवसा बडनेरा, अमरावती शहरात धावत असते.
रिक्षाची वैशिष्ट्ये काय?
1. रुग्णांसाठी झोपायला बेड
2. पूर्णतः पॅक बंद ऑटो
3. एसीची सुविधा
4. मनोरंजनासाठी टीव्ही
advertisement
5. रात्रीच्यावेळी लखलखणारी लायटिंग
6. साऊंड सिस्टीम
7. पावर विंडो काच
रुग्णांसाठी मोफत सेवा
माझ्या ऑटोरिक्षेत बेडची सुविधा असून, आजारी रुग्णांना झोपून नेण्याची सोय आहे. अडचणीत असलेल्या रुग्णांकडून मी पैसे घेत नाही. रुग्णांना मदत करायला मिळाली, हीच माझी खरी कमाई आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते. कधीही कॉल करा, रुग्णांसाठी रिक्षा कधीही तयार असते.
advertisement
रिक्षाचे चार्जेस काय?
मी माझी रिक्षा जास्तीत जास्त स्पेशलमध्ये घेऊन जातो. त्यासाठी मी 20 रुपये प्रति किमी असे चार्जेस ठेवले आहेत. तसेच अमरावती बडनेरा शहरात 50 रुपये सीटप्रमाणे चार्जेस ठेवले आहेत, अशी माहिती कृष्णा रोडगे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/अमरावती/
कारसारखे दरवाजे, पॉवर विंडो काचा अन् TV, Car लाजवले अशी रिक्षा, विदर्भाच्या राणीचा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement