TRENDING:

रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO

Last Updated:

Inspiring Story: शिक्षणादरम्यानच त्यांची ट्रान्सजेंडर असल्याची ओळख स्पष्ट झाली आणि संघर्षाला सुरुवात झाली. कुटुंबाचा विरोध सहन करावा लागला आणि घर सोडावे लागले.

advertisement
पुणे: तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे फक्त रस्त्यावर पैसे मागणारी अशी समाजात तयार झालेली ओळख आता बदलू लागली आहे. ही प्रतिमा पुसण्यासाठी LGBTQ कम्युनिटीकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आज या समाजातील अनेकजण नोकरी करत असून काही जण स्वतःचे व्यवसाय देखील करत आहेत. पुण्यातील ट्रान्सजेंडर मनस्वी गोईलकर यांनी फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा हा प्रवास अत्यंत खडतर राहिला. घर सोडण्यापासून ते रस्त्यावर पैसे मागण्यापर्यंत अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जात त्यांनी आज उद्योजिकेपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासाविषयी लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

रस्त्यावर पैसे मागण्यापासून ते उद्योजिकापर्यंतचा प्रवास

मूळच्या सांगली जिल्ह्यातील असलेल्या मनस्वी गोईलकर यांनी सांगितले की, रस्त्यावर पैसे मागण्यापासून ते उद्योजिका होण्यापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षण सांगलीत पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी घेतली. शिक्षणादरम्यानच त्यांची ट्रान्सजेंडर असल्याची ओळख स्पष्ट झाली आणि संघर्षाला सुरुवात झाली. कुटुंबाचा विरोध सहन करावा लागला आणि घर सोडावे लागले.

advertisement

Success Story : पिकअप गाडीत नाश्ता सेंटर, 1200 वडापावची होते विक्री, तरुणाचा महिन्याला इतका थेट नफा

घर सोडल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी रस्त्यावर पैसे मागणे तसेच इतर मार्गांचा अवलंब केला. मात्र, शिक्षण घेतले असताना हे का करत आहोत? हा प्रश्न सतत पडत होता. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नोकरी केली, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भेदभावाला सामोरे जावं लागलं. या गोष्टीला कंटाळून अखेर नोकरीचा राजीनामा दिला, असं मनस्वी सांगतात.

advertisement

शेवटी आवडीच्या व्यवसायात..

नोकरी सोडल्यानंतर, उदरनिर्वाहासाठी मनस्वीने अनेक छोटे-मोठे व्यवसाय केले. फटाक्यांचा व्यवसाय असो किंवा आयुर्वेदिक झाडांचा व्यवसाय, अशा अनेक प्रकारचे व्यवसाय त्यांनी करून पाहिले. पण कायमच त्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं करिअर घडवायचं होतं. त्याचं शिक्षणही घेतलं होतं. त्यामुळे शेवटी मनस्वी यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. भांडवल उभारून त्यांनी पुण्यातील भैरव नगर, गल्ली नंबर 13, धानोरी येथे फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारचे ड्रेस डिझाईन करून मिळतील. आमच्या या प्रयत्नांना समाजाने देखील साथ द्यावी, असे आवाहन मनस्वी यांनी केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल