हर्षलची आई अनेक वर्षांपासून उत्तम पुरणपोळी तयार करत होती. हर्षलने त्यात व्यवसायाची दृष्टी जोडली आणि दोघांनी मिळून या घरगुती व्यवसायाला एक नवी दिशा दिली. आज त्यांची पुरणपोळी फक्त मुंबईतील नव्हे तर अमेरिका, दुबईच्या ग्राहकांच्या घरात पोहोचत आहे. यामुळे त्यांना मोठी उलाढाल मिळत असून, महिन्याला 1.50 लाख ते 2 लाखांचा व्यवसाय सुरू आहे.
advertisement
Farmer Success Story: नोकरी सोडली, फक्त 20 गुंठ्यांमध्ये सुरू केला नर्सरी व्यवसाय, वर्षाला 6 लाख रुपयांचा नफा
हर्षल आणि त्याच्या आईने 9 ते 10 महिलांना कामाची संधी दिली आहे. हे दोघेही या महिला कामगारांना कुटुंबाचा भाग मानतात, ज्यामुळे कामात प्रेम आणि आपुलकी जाणवते. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून हे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.
त्यांची पुरणपोळीही तितकीच खास आहे. प्रत्येक 100 ग्रॅम पोळीत 85 टक्के पुरण असते, आणि ती 6-7 दिवस ताजी राहते. एक पोळी फक्त 33 रुपयांत मिळते, जी चविष्ट आणि परवडणारी आहे. ग्राहकांच्या मोठ्या पसंतीमुळे ती आता मोठ्या दुकानांपर्यंत पोहोचली आहे.
या व्यवसायाच्या माध्यमातून आई आणि मुलाने महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती देश-विदेशात पोहोचवली आहे. ही केवळ यशाची गोष्ट नाही, तर कुटुंब, संस्कृती, आणि समाजसेवेचा अनोखा संगम आहे.