TRENDING:

कोणीच सेफ नाही, लाखो लोक उद्ध्वस्त होतील; जग हादरवणारी भविष्यवाणी, स्वत:ला कसे वाचवाल?

Last Updated:

Global Warning: सोने-चांदी आणि क्रिप्टोच्या घसरणीत जगभरात आर्थिक भीतीचं सावट पसरलं आहे. ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी इशारा दिला आहे की- मंदी सुरू झाली आहे आणि लाखो लोक आता उद्ध्वस्त होणार आहेत.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये सध्या मोठी घसरण (Gold-Silver Price Crash) पाहायला मिळत आहे. त्याचवेळी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही पडझडीचा काळ सुरू आहे. या घडामोडींमध्ये आता जगप्रसिद्ध पुस्तक ‘Rich Dad Poor Dadचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी गुंतवणूकदारांना एक मोठा इशारा दिला आहे. त्यांनी अमेरिकन शेअर बाजारात येणाऱ्या प्रचंड घसरणीचा अंदाज व्यक्त करत सांगितले की, मंदी (Recession) आधीच सुरू झाली आहे आणि लवकरच लाखो लोक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतील.

advertisement

रॉबर्ट कियोसाकी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ताज्या पोस्टमध्ये लिहिले आहे. मोठ्या आर्थिक मंदीची सुरुवात झाली आहे, लाखो लोक बर्बाद होणार आहेत. स्वतःचा बचाव करा. त्यांनी गुंतवणूकदारांना इशारा देताना असेही सांगितले की, वॉल स्ट्रीटमधून अब्जावधी डॉलर्स गायब होऊ शकतात, कारण शेअर बाजार सध्या अशा टप्प्यावर आहे जो पूर्ण आर्थिक संकटाचा संकेत देतो. त्यांच्या मते ही स्थिती 2008 नंतरची सर्वात गंभीर ठरू शकते.

advertisement

कियोसाकी यांनी पुन्हा एकदा आपला जुना सल्ला अधोरेखित करत गुंतवणूकदारांना आवाहन केले की- संकटाच्या काळात सोनं, चांदी आणि बिटकॉइन हेच सुरक्षित आश्रयस्थान आहेत. त्यांनी लोकांना कागदी चलनावर (Fiat Currency) अवलंबून न राहता, वास्तव मालमत्तांमध्ये (Real Assets) गुंतवणूक करा, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या मते सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम (Ethereum) ही मालमत्ता सध्याच्या अत्यंत अस्थिर आर्थिक परिस्थितीत सर्वात सुरक्षित पर्याय आहेत.

advertisement

कियोसाकी यांचा नेहमीच हा ठाम विश्वास राहिला आहे की- शेअर्स, बाँड्स आणि पारंपरिक चलन (Fiat Money) हे सर्व Fake Money) आहेत, जे आर्थिक व्यवस्थेच्या पतनामुळे कधीही नष्ट होऊ शकतात. सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातू आणि क्रिप्टोकरन्सी या True Assets आहेत. ज्या महागाई, कर्ज संकट आणि केंद्रीय बँकांच्या धोरणांविरोधात बचाव देतात.

advertisement

ही पहिली वेळ नाही जेव्हा रॉबर्ट कियोसाकी यांनी अशी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. यापूर्वी कोरोना काळातही त्यांनी जागतिक इतिहासातील सर्वात मोठ्या मंदीची चेतावणी दिली होती. त्याचप्रमाणे 2025 च्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितले होते की उच्च चलनवाढ (High Inflation) आधीच सुरू झाली आहे आणि अमेरिकन ट्रेझरी बाँड्सवरील गुंतवणूकदारांची कमी मागणी पुढे लाखो लोकांना आर्थिक संकटात ढकलू शकते. त्यांच्या मते, शेअर्स आणि बाँड्सबद्दलच्या मोठमोठ्या दाव्यांमागे सर्वात मोठं खोटं दडलेलं आहे.

दरम्यान जागतिक बाजारात सध्या सोनं आणि चांदी दोन्ही दबावाखाली आहेत. मजबूत अमेरिकन डॉलर (US Dollar) आणि भू-राजकीय तणावात झालेल्या सुधारणा यांमुळे मागील आठवड्यात या दोन्ही धातूंमध्ये तीव्र घसरण दिसून आली. अनेक गुंतवणूकदार पुन्हा एकदा शेअर मार्केट आणि डॉलर-आधारित मालमत्तांकडे वळत आहेत, त्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव वाढला आहे.

फक्त तेवढंच नव्हे, तर जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) सुद्धा अडचणीत आली आहे. ऑक्टोबर महिन्यात ती 1,26,000 डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली होती. पण त्यानंतर गेल्या महिन्यात ती सुमारे 5% ने घसरली आहे. त्याचबरोबर इथेरियम आणि इतर डिजिटल टोकन्समध्येही मोठी घसरण झाली आहे.

एकूणच सोनं-चांदी आणि क्रिप्टो मार्केटमधील पडझडीच्या पार्श्वभूमीवर रॉबर्ट कियोसाकींचीा इशारा गुंतवणूकदारांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळ अस्थिर, भीतीदायक आणि आर्थिकदृष्ट्या विध्वंसक ठरू शकतो.

मराठी बातम्या/मनी/
कोणीच सेफ नाही, लाखो लोक उद्ध्वस्त होतील; जग हादरवणारी भविष्यवाणी, स्वत:ला कसे वाचवाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल