समीर दिघे पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र पगारात घरखर्च भागत नसल्याने त्यांनी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधला. त्यांच्या आई घरून बिर्याणी बनवून विकत असल्याने समीर यांनी हा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा छोटा स्टॉल सुरू केला. हा स्टॉलच त्यांच्यासाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरला. आज या स्टॉलमधून समीर दिघे महिन्याला सुमारे लाखभर रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
Pune MHADA : पुणेकरांचं स्वप्न होणार साकार! या तारखेला 'म्हाडा'ची सोडत, घराची 'चावी' कोणाला?
शिक्षकाची नोकरी सांभाळून व्यवसाय
समीर दिघे हे नोकरीवरून आल्यानंतर स्वतःचा बिर्याणी स्टॉल चालवतात. त्यांच्या स्टॉलवर हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी, कोलकत्ता बिर्याणी अशा विविध प्रकारच्या बिर्याण्या मिळतात. बिर्याणी ते स्वतःच बनवतात. त्यांचा मधुकर पवळे ब्रिज जगदंब होममेड बिर्याणी हा स्टॉल क्रमांक 29, निगडी येथे आहे. कमी किमतीत जास्त क्वांटिटी मिळत असल्याने या स्टॉलला नागरिकांची मोठी गर्दी असते.